आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग दुसऱ्या वर्षीही तापमानाची कमाल, फेब्रुवारीतच गाठली तापमानाने छत्तिशी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तापमान माेजताना अधिकारी. - Divya Marathi
तापमान माेजताना अधिकारी.
औरंगाबाद- होळीनंतर उन्हाचा चटका खऱ्या अर्थाने जाणवायला सुरुवात होते. मात्र, हवामानातील बदलामुळे सलग दुसऱ्या वर्षी फेब्रुवारीतच कमाल तापमान ३६ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे कमाल किमान (१७.४) तापमानात ५५ टक्के फरक आहे. परिणामी पहाटे गारवा तर दिवसा रात्री उकाडा जाणवत आहे.
 
गतवर्षी मान्सून समाधानकारक बरसला. थंडीचा मोसम बऱ्यापैकी पोषक राहिला. अति कडाक्याची थंडी पडली नाही. हिवाळ्यात पावसाचे आगमन झाले नाही. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सियस म्हणजे जास्त राहिले. एरवी तापमान २७ ते २२ अंशांदरम्यान राहते. मान्सूनची कृपा राहिल्याने त्याचे फारसे परिणाम झाले नाहीत. खरीप रब्बीचे पीक जोमात आले. होळीपर्यंत हिवाळा असतो. मात्र, वनाच्छादित क्षेत्र अत्यल्प, वाहन संख्येची उच्चांकी पातळी यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही उन्हाळ्याला साडेतीन आठवडे लवकर सुरुवात झाली आहे. 

तापमान वाढीचे परिणाम
उन्हामुळेदुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळले जात आहे. नागरिक टोपी, पांढरे रुमाल, हेल्मेट, गॉगलचा वापर करत आहेत. रसवंती, ज्यूस सेंटरमधील गर्दी वाढली आहे. तसेच ताप, सर्दी, खोकला, दमा, उन्हाळी लागणे अशा आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. उकाड्यामुळे फॅन, कूलर, एसी सुरू करण्यात आले. जलसाठ्यांत वेगाने बाष्पीभवन होत आहे. अवर्षणप्रवण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून ४२ टँकरद्वारे ४८ गावांत पाणी पुरवले जात आहे. वन्यजीवांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. उशिरा पेरणी झालेल्या गव्हाचे उत्पादन, दर्जावर २० टक्के परिणाम होण्याची शक्यता आहे. 

मान्सूनसाठी चांगले संकेत 
सूर्यतळपायलासुरुवात झाली आहे. फेब्रुवारीचे १५ दिवस आणि मार्च ते मे असा उन्हाळा ऋतूला मोठा कालावधी मिळाला आहे. व्यत्यय आला नाही तर मान्सून वेळेवर दाखल होऊन चांगला बरसेल. मार्चच्या पंधरवड्यानंतर प्रखर उन्हाळ्याला सुरुवात होईल. डॉ.रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ. 

गतवर्षीचे उच्चांकी तापमान 
२० फेब्रु.३४.४२१.८ 
२१ ३५.१ २३.४ 
२२ ३५.२ २२.६ 
२३ ३६.० २०.१ 

यंदाचे उच्चांकी तापमान 
१८ फेब्रु.३५.०१६.६ 
१९ ३६.० १६.० 
२० ३५.८ १७.४ 

गतवर्षीपेक्षा यंदा पाच दिवस आधीच तापमान वाढ झाल्याचे दिसून येते. किमान तापमान अंश सेल्सियसने कमी असल्याचे चिकलठाणा वेधशाळेने घेतलेल्या नोंदींवरून स्पष्ट होते. 

सोमवारी असे होते तापमान 
वेळ - तापमान 
८.३० २१.४ 
११.३० ३२.४ 
२.३० ३५.० 
५.३० ३५.८ 
बातम्या आणखी आहेत...