आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीचा साठा 20.25 टक्क्यांवर, वरच्या धरणांतून विसर्ग सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक जिल्ह्यात संततधार सुरू असून पाणलोट क्षेत्रामध्येही सातत्याने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. जायकवाडीत वरच्या धरणांतून विसर्ग सुरू आहे. रविवारी जायकवाडीचा जलसाठा २०.२५ टक्क्यांवर पाेहोचला. ७५% भरलेल्या गंगापूर धरणातून रविवारी २ हजार क्युसेक तर दारणा धरणातून ११ हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात अाला. आतापर्यंत नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीकडे ८ ते १० टीएमसी पाणी गेल्याचा अंदाज पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय सोमवारी होण्याची शक्यता आहे. 
 
वरच्या धरणांतून सुरू आहे विसर्ग
नांदूर-मधमेश्वरमधून २१,३८४ क्युसेक, दारणातून १५,७६९ क्युसेक, वाकी बंधाऱ्यांतून ३,६३७ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.  
 
 
- १५०२.०० फूट (४५७.८१० मी.) जायकवाडीची पाणीपातळी
- ३०१६६ क्युसेक आवक
- ३४.४८४ दलघमी एकूण पाणीसाठा
- ३९६.३७८ दलघमी जिवंत पाणीसाठा
- १८.६०% धरणाची पाणी टक्केवारी
 
बातम्या आणखी आहेत...