आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजासह वाढीव खर्च, मानसिक त्रासाची नुकसान भरपाईही द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ठरलेल्या वेळी सदनिकेचा ताबा दिला नाही. नंतर वाढीव दर लावत जास्तीचे पैसे उकळले. कसाबसा घराचा ताबा दिला, पण वीज, पाणी या मूलभूत सुविधाच नव्हत्या. ताबा दिला २०१४ ला पण घराचे वाटपपत्र कागदोपत्री २०११ पासून दाखवून व्याजाची अकृषक कर, भुईभाडे याची वसुली केली.
 
 एका सामान्य नागरिकाला अशा प्रकारे म्हाडाने त्रस्त केले. अखेर चिडून त्याने ग्राहक मंचात धाव घेतली. याची गंभीर दखल घेत जिल्हा ग्राहक मंचाने या त्रस्त सदनिकाधारकाचा वाढीव खर्च व्याजासह परत करण्याचे आदेश म्हाडाला दिले आहेत.
 
 पैसा मिळेल पण सतत सात वर्षे जी धावपळ आणि त्रास झाला तो मात्र भरून निघणार नाही. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत हेच खरे. 

हजारावर सदनिका पडून 
सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने म्हाडा विविध गृहप्रकल्पाची उभारणी करते. सोडतीद्वारे यशस्वी झालेल्या सदनिकाधारकांना बँकेचे कर्जही उपलब्ध करून देते. असे असताना शहरात पैठण तालुक्यातील सर्व सुविधायुक्त अशा १०६८ सदनिका ग्राहकच नसल्याने धूळ खात पडून आहेत. त्यामुळे म्हाडाचे कोट्यवधी रुपये गुंतून पडले आहेत, तर दुसरीकडे प्रामाणिकपणे कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना मुजोर अधिकारी, कर्मचारी कशा प्रकारे त्रास देतात याचेच हे एक प्रकरण... 
 
नेमके काय आहे प्रकरण? 
म्हाडाच्यावतीने २००७ मध्ये मुख्य प्रशासकीय इमारतीच्या परिसरातच नगर भूमापन क्रमांक २०७१९/९ येथे उच्च उत्पन्न गटासाठी १२ सदनिका विक्रीसाठी असल्याची जाहिरात देण्यात आली. एका सदनिकेची किंमत १३ लाख रुपये (अंदाजे) एवढी होती. ही सदनिका घेण्यासाठी १० टक्के रक्कम अर्जासोबत भरावयाची होती. त्यानुसार रमेशचंद्र मोराणकर यांनी बारापैकी एका सदनिकेसाठी प्रस्ताव दाखल केला होता.
 
नियमानुसार त्यांनी सुरुवातीला लाख ३५ हजार अशी दहा टक्के रकम म्हाडाकडे भरली होती. उर्वरित पैसे दोन वर्षांत सदनिका ताब्यात घेण्यापूर्वी भरावयाची होती. त्यानंतर त्यांना सदनिकेचा ताबा मिळणार होता. मोराणकर यांनी मुदतीत संपूर्ण पैसा म्हाडाकडे भरला. 
 
 
मात्र, सहा ते सात वर्षे उलटल्यानंतरही त्यांना सदनिकेचा ताबा मिळाला नाही. त्यांनी याबाबत म्हाडा कार्यालयाकडे विचारपूस केली असता घराचे वाटपपत्रच रद्द झाल्याची नोटीस त्यांच्या हातात टेकवण्यात आली. यावर अपील दाखल करत त्यांनी पुन्हा सदनिका मिळवली. पण, म्हाडाने त्यांच्याकडून वाढीव रकम तब्बल लाख २८ हजार ३०६ रुपये विलंब शुल्कासह वसूल केले.
 
ताबा मिळाला, पण... 
मोराणकरयांना सात वर्षांनंतर कसाबसा घराचा ताबा मिळाला, पण तिथे वीज, पाणी, ड्रेनेजलाइन या मूलभूत सुविधाच नव्हत्या. एवढेच नव्हे तर घराची दारे-खिडक्यांच्या काचा फुटलेल्या दिसल्या. त्यांच्या दुरुस्तीसाठी मिळकत व्यवस्थापक.
 
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि त्यानंतर थेट मुख्याधिकाऱ्यांपर्यंत मोराणकर यांना पुन्हा असंख्य चकरा माराव्या लागल्या. यात सहा महिने गेले तरीही त्यांच्या तक्रारीची साधी दखलही कुणी घेतली नाही. मोराणकरांना म्हाडाने सदनिकेचा ताबा देण्यास विलंब केल्याने स्टॅम्प ड्यूटी आणि नोंदणी खर्चाचा अतिरिक्त खर्च त्यांना करावा लागला.
 
२०१४ मध्ये घराचा ताबा दिला असताना प्रत्यक्षात कागदोपत्री २०११ मध्ये ताबा दिल्याचे दाखवून व्याज आकारणी सुरू केली. त्याही पुढे जात २०१० पासूनच वार्षिक भुईभाडे अकृषक कराची वसुली केली. दरम्यानच्या काळात नोव्हेंबर २०१५ रोजी मला माझे पैसे परत मिळावेत म्हणून मोराणकर यांनी तगादा लावला.
 
पण बांधकाम साहित्याचे आणि जागेचे दर वाढले असे म्हणत अतिरिक्त शुल्क परत मिळणार नाही आणि दुरुस्तीही होणार नाही तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा, इकडे पुन्हा फिरकूही नका, असे सांगून मोराणकरांना म्हाडाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दमदाटीही केली. 
 
ग्राहक मंचाकडून दखल 
सन २००७ च्या सोडतीनुसार मोराणकर यांनी दोन वर्षांत संपूर्ण किंमत भरली होती. त्यांना निर्धारित काळात सदनिकेचा ताबा मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात सात वर्षे उलटल्यानंतर म्हणजेच २०१४ मध्ये त्यांना घराचा ताबा मिळाला. बांधकाम साहित्याचे दर वाढल्याचे कारण सांगून अतिरिक्त पैसाही त्यांच्याकडून वसूल केला.
 
दुसरीकडे घराचे वाटपपत्र कागदोपत्री २०११ पासून दाखवून व्याजाची अकृषक कर, भुईभाडे याची वसुली केली, परंतु याही शुल्काची आकारणी कशी केली, याचे कोणतेही स्पष्टीकरण म्हाडा कार्यालयाने दिलेले नाही. यामुळे म्हाडाने सेवेत केलेली कमतरता अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे ग्राहकमंचाच्या निदर्शनास आले. 

असा आहे ग्राहक मंचाचा आदेश : आदेश प्राप्तीपासून ६० दिवसांत सदनिकाधारकाला लाख ७० हजार रुपये एवढी रकम १९ नोव्हेंबर २०१३ पासून दरसालदरशेकडा टक्के व्याजदाराने अदा करावी. सदनिकेतील सुविधा दुरुस्तीसाठी आलेला खर्च १५ हजार रुपेय आणि मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून १५ हजार तसेच तक्रारखर्च हजार असा एकूण लाख हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात जिल्हा ग्राहक मंचाने म्हाडाला दिले आहेत. 
 
ग्राहक मंचात धाव 
यानंतर मोराणकर यांनी जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली. जुन्या अंदाजीत किमतीचे आणि वाढीव शुल्काच्या पावत्या, दुरुस्तीसाठी केलेल्या लेखी अर्जाच्या प्रति, तसेच प्रत्यक्षात बांधकाम झाल्याचा पुरावा जोडला. वाढीव दरवाढीची चुकवलेली रकम लाख ४६ हजार ३०६ रुपये मला व्याजासह मिळावी.
 
एवढेच नव्हे तर नळ, वीज, ड्रेनेज आणि स्टॅम्प ड्युटी नोंदणीचा अधिकचा खर्च रुपये ९२ हजार तसेच सदनिकेच्या किरकोळ दुरुस्तीसाठी लागलेला २५,००० मानसिक त्रासाची नुकसान भरपाई लाख मिळावी अशी मागणी सर्व पुराव्यासह २० जानेवारी २०१६ रोजी जिल्हा ग्राहक मंचाकडे मोराणकर यांनी केली. 
 
आयोगाकडे अपील केले 
- काही अपरिहार्यकारणामुळे बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण झाले नव्हते. ३१ मार्च २०११ मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. तक्रारदाराने काही हप्ते वेळेवर भरल्याने दंड वसूल केला आहे.जाहिरात देतांनाच वेळोवेळी होणारे बदल लिखित स्वरूपात आम्ही कळवले होते. 
तक्रारदारांनीच वाढीव किमतीला संमती दिल्यानंतरच आम्ही पुढील कार्यवाही केलेली आहे. त्यांना ३१ जानेवारी २०१४ रोजी नियमानुसार सदनिका वाटप करून ताबा दिला आहे.
 
काही दिवस प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सदनिका रिकामी होती. त्यामुळे ती खराब झाली होती. पण वाटप झाल्यानंतर दुरुस्ती करून देण्यात आली होती. म्हाडा ही शासनाने अधिकृत केलेली पारदर्शक संस्था आहे. जिल्हा ग्राहक मंचाने दिलेल्या निकालाविरोधात आम्ही राज्य आयोगाकडे अपील दाखल केलेले आहे. एस.एच. वानखेडे, विधीअधिकारी, म्हाडा प्रशासन 
 
- म्हाडाच्या वरिष्ठ कार्यालयाने दिनांक ऑगस्ट २००९ रोजी एक ठराव घेतला होता. त्यात जाहिरातीत नमूद केलेल्या सदनिकेची किंमत अंतिम समजवण्यात यावी त्यात कोणताही बदल करण्यात येऊ नये असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर तसे परिपत्रकच काढण्यात आले होते.
 
म्हाडाने वरिष्ठ कार्यालयाचे आदेश झुगारून बेकायदेशिररीत्या साडेपाच लाख रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त वसुली माझ्याकडून केली. त्यामुळे माझी तळपायाची आग मस्तकाला पोहोचली आणि शेवटी मी ग्राहक मंचात धाव घेतली यात मला न्याय मिळाला त्याबद्दल मंचाचे आभार. -रमेशचंद्र मोराणकर, त्रस्त सदनिकाधारक 
बातम्या आणखी आहेत...