आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलपुरवठा योजनांकडे दुर्लक्ष; खेड्यात वाढली टँकरची संख्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या १० वर्षांत गावखेड्यांत सुरू केलेल्या पाणीपुरवठा योजनांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यानेच जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढल्याचे समोर येत आहे. याला प्रशासकीय सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावणे हे कारण पुढे करण्यात येत असले तरी ती खालावू नये म्हणून विहीर पुनर्भरणाचे कोणतेही कार्यक्रम हाती घेण्यात येत नसल्याने पाणीपातळी आणखी खालावत असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील १३८२ खेडी तसेच वाड्यांपैकी ७४७ गावांत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत. वाड्यांमध्ये ही व्यवस्था नसली तरी कमीअधिक प्रमाणात तेथेही पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु अलीकडे म्हणजेच गेल्या पाच ते सहा वर्षांपासून योजनांसाठी खोदलेल्या विहिरी जानेवारीनंतरच कोरड्या पडत असल्यामुळे टँकरची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.
पुनर्भरणाचा होईल परिणाम
विहीर पुनर्भरण केल्यास जमिनीतील पाणी वाढेल. पहिल्या पावसातच विहिरी भरल्याने जुलै ते ऑगस्टपर्यंत टँकर सुरू ठेवण्याची गरज पडणार नाही. अनेक गावात विहीर पुनर्भरण केलेले नाही.
मोटार दुरुस्ती होत नाही
विहिरीतील पाणी संपण्याबरोबरच अन्य काही अडचण असेल तर त्याकडेही दुर्लक्ष होते. त्यामुळे मोटार नादुरुस्त, विद्युत पुरवठा खंडित अशा कारणांनीही योजना बारगळतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, खोली वाढवणे काळाची गरज...
बातम्या आणखी आहेत...