आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात, ड्रेनेजलाइन फुटून घाण पाणी रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील विविध भागात ड्रेनेजचे पाणी साचल्याने दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नाक दाबून जावे लागते. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात मागील आठ दिवसांपासून ड्रेनेजलाइन फुटून घाण पाणी रस्त्यावर साचले आहे. तसेच सिडको एन- भागात रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक त्रस्त आहेत. मोरेश्वर हाउसिंग सोसायटीतही दुर्गंधी वाढली आहे.
सिडको एन- भागातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकही संतप्त झालेले आहेत. उच्चभ्रू वसाहत असताना या ठिकाणी रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे झालेले आहे. हनुमान मंदिरालगत वळण रस्त्यावर रस्ते उखडलेले असून पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचते. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात यावेत. रस्त्याचे डांबरीकरण करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन भागातील मुख्य रस्त्यावर मागील आठ दिवसांपासून ड्रेनेजलाइन फुटून घाण पाणी रस्त्यावर साचले आहे. रेल्वेस्टेशनवर जाताना रस्त्यात दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचले असल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घाणीच्या बाजूलाच भोजनालय, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या असल्यामुळे नागरिकांचे अारोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत उघड्यावर खाद्यपदार्थाची सर्रासपणे विक्री केली जात आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या हजारो नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असताना महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. तब्बल तीनशे-चारशे घरे आणि दिवसभरात रेल्वेस्टेशन येथे येणाऱ्या हजारो नागरिकांना याचा त्रास होत आहे. याच ठिकाणी रिक्षाचालक उभे राहत असून त्यांचीही अडचण होत आहे. त्यामुळे तुंबलेले ड्रेनेज दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मोरेश्वर सोसायटीतील नाल्याचे तुंबले पाणी...
बातम्या आणखी आहेत...