आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indena Customers Will Have To Take A New Number Of Gas

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडेनच्या गॅस ग्राहकांना घ्यावा लागणार नवीन नंबर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील प्रयाग गॅस आणि विनय इंडेन गजानन एजन्सीचे बुकिंग नंबर बदलल्याने तब्बल ३१ हजार ग्राहकांनाही आपले ग्राहक नंबर बदलावे लागणार आहेत. त्याशिवाय गॅस बुकिंग होणार नसल्याचे समोर आले. कंपनीकडून सप्टेंबरपासून ग्राहकांना गॅस बुकिंग करण्यास अडचण येत होती. सोमवारी प्रयाग एजन्सीसमाेर नागरिकांनी सकाळी अचानक ठिय्या आंदोलन करून गोंधळ घातला.
प्रयाग गॅस एजन्सी तांत्रिक अडचणीमुळे विनय इंडेन एजन्सीला चालवण्यासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे एजन्सीचा लँडलाइन नंबर बदलला आहे. ही एजन्सी आता विनय एजन्सी म्हणून अस्तित्वात आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या नंबरवरून होणारी ग्राहकांची बुकिंग रद्द झाली. तसेच गजानन महाराज मंदिराजवळील विनय एजन्सी आता सौरभ एजन्सी झाली आहे. त्यांनाही नवीन नंबर देण्यात आला आहे. परिणामी या एजन्सीच्या ३१ हजार ग्राहकांचा ग्राहक नंबर आपोआप बदलण्यात आला आहे. मात्र नागरिकांना नवीन बदलाची माहिती नसल्याने जुन्या नंबरहूनच बुकिंग करण्यात येत होते. मात्र दोन्ही नंबर बदलल्याने गॅस बुकिंग होत नव्हते. कंटाळून नागरिकांनी प्रयाग एजन्सीवर सोमवारी सकाळी गोंधळ घातला. याबाबत "दिव्य मराठी' प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता हा नवीन बदल असल्याचे समोर आले. ग्राहकांची सर्व नोंद कंपनीकडे असूनही त्यांना याबाबत कोणतीच पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने कंपनी आणि एजन्सीवर नागरिकांनी रोष व्यक्त केला. आता नवीन नंबरवरून कॉल केल्यास बुकिंग करणे सोपे होणार आहे.

प्रयाग एजन्सी
०२४०-२३५४७४२,२३२१७३९
विनय इंडेन
०२४०-२४७४२१९,२४८८६३४
सौरभ एजन्सी
०२४०-२४४२७५६,२३५३०५६

^ग्राहकांनी एजन्सीतील बदल लक्षात घेऊन नवीन लँड लाइन नंबरवर संपर्क साधल्यास त्यांना नवीन कस्टमर नंबर देण्यात येईल. त्यावरून बुकिंग करण्यात येईल. नारायणखडके, संचालक, विनय, प्रयाग एजन्सी