आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SEE PICS: फॉरेनमधला स्वातंत्र्यदिन मराठी माणूस असा करतो साजरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडमध्ये ध्वजवंदन करतांना भारतीय उच्चायुक्त. - Divya Marathi
इंग्लंडमध्ये ध्वजवंदन करतांना भारतीय उच्चायुक्त.
औरंगाबाद - 15 ऑगस्टचा जल्लोष अख्ख्या भारतात दिसतो. यानिमित्त महाराष्ट्रातही खेड्यांपासून ते मेट्रो शहरात असंख्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण 'देश से दूर' असलेला मराठी माणूस- मातृभूमीसाठी ज्याचे प्राण तळमळत असतात, तोही तितक्याच जोशात अन् उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करतोय. यानिमित्त परदेशातील हे मराठी बांधव एकमेकांच्या भेटीगाठी घेतात, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, अस्सल मराठी खाद्यपदार्थ मांडून भारताच्या संस्कृती, देशाभिमानाचे जतन करतात.
खास स्वातंत्र्यदिनानिमित्त अनिवासी मराठी बांधवांतर्फे साजरा होणाऱ्या जल्लोषाचे फोटो घेऊन आलो आहोत divyamarathi.comच्या वाचकांसाठी... 
 
या गोष्‍टींची आहे परदेशातील लोकांना भुरळ...
प्रामुख्‍याने महाराष्‍ट्रातून अमेरिका, इंग्‍लंड आणि जपानसारख्‍या विकसित राष्‍ट्रांमध्‍ये स्‍थायिक झालेल्‍यांची संख्‍या मोठी आहे. परदेशात मराठी लोकांनी एकत्र येऊन अनेक ग्रुप सुरु केले. दिवाळी, दसरा, गणेशोत्सवाप्रमाणे स्‍वातंत्रदिन देखील जगभरात राहणारया मराठी लोकांतर्फे जल्‍लोषात साजरा केला जातो. सध्या लंडन येथे स्थायिक असलेले मूळ औरंगाबादचे तथा माय मराठी संकेतस्थळाचे सिईओ डॉ. विजय इंगळे म्‍हणाले,  महाराष्ट्रातील हजारो लोक नोकरी, उद्योगनिमित्त इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आहेत. ते इंग्लंडच्या वेगवेगळ्या प्रांतात राहतात. एरव्ही आपापल्या प्रांतात उत्सव साजरे करणारे हजारो अनिवासी महाराष्ट्रीयन स्वातंत्र्य दिनानिमित्त एकाच ठिकाणी येतात. स्वातंत्र्यदिनानंतर येणाऱ्या वीक एन्डला दिवसभर सांस्कृतिक आणि सामाजिक  कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रीयन ढोल ताशे आणि ठसकेबाज लावणीने सबंध इंग्लंडकरांना भुरळ घातलेली आहे. इंग्लंडमध्ये यासाठी डॉ. विजय इंगळे, रवींद्र गाडगीळ, सुशील रापटवर, अजय मुरुडकर, अजिंक्य भावे, सागर डोग्रीकार, वैशाली मंत्री, केदार लेले, जयश्री दंडवते, डॉ रुंदा रोटे, डॉ. नेने आणि दिलीप आमडेकर समन्वयाचे काम करतात.                                              
 
पुढील स्लाइड्सवर जाणून पाहा, फॉरेनमधला मराठी बांधवांचा 15 ऑगस्ट! 
बातम्या आणखी आहेत...