आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रमांनी रंगला स्वातंत्र्य दिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - विविधशासकीय कार्यालये, शैक्षणिक-सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्या वतीने विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दनि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वाळूजग्रामपंचायत
सरपंचरंजना भोंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामसेवक एस. के. वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश गायकवाड, शकिलाबी इनामदार, अलकाबाई पवार, मुक्ताबाई देसाई, रंजना परोडकर, नंदू सोनवणे, ज्ञानेश्वर देसाई यांची उपस्थिती होती.

वाळूज पोलिस ठाणे

पोलिसनिरीक्षक अशोक कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपनिरीक्षक संजय अहिरे, रेश्मा सौदागर, अजयकुमार पांडे, सहायक फौजदार सागरसिंग राजपूत, पोलिस हेड काॅन्स्टेबल सलीम शेख, रवी खंडाळकर, दिलीप मोदी, संतोष लोंढे, ए. पी. झनिे, सुभाष गायकवाड उपस्थित होते.

जयभद्राशाळा, रांजणगाव
शाळेच्याप्रांगणात ज्येष्ठ नागरिक चांगदेव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक कृष्णा दाभाडे, पालक प्रतनििधी उत्तम सुंदर्डे, सतीश चौधरी, अशोक आहेर, भालचंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ववििध महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यात भारतमातेच्या वेशभूषेत वैष्णवी ढाकुलकर, झाशीची राणी- शीतल खंदारे, शहीद भगतसिंग -आकाश जोशी यांचा समावेश होता. तुषार मोकळे, सिमरन शेख, आकाश वाघ, पूजा गरड, अवनिाश आळजकर, खुशबू चौरसिया, दीपक राठोड, श्रद्धा माकवान, तनिष्का झेंडेकरी, साक्षी डोईफोडे, समीक्षा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनीषा सोनवणे, स्वाती तुपे यांनी केले, तर आभार राहुल राहिंज यांनी मानले.

जिल्हापरिषद शाळा, पंढरपूर
शाळेच्यामुख्याध्यापक प्रकाश दाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी जिल्हा परिषद सदस्या योगिता बहुले, उपसरपंच संतोष चोरडिया, पंचायत समिती सदस्य गणेश नवले उपस्थित होते.

शहीदभगतसिंग शाळा, सिडको
संस्थेचेसरचिटणीस दामोदर मानकापे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शाळेचे शिक्षक, पालक विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापिका मीनाक्षी मानकापे यांनी आभार मानले, तर देविदास इंदोरे, सुरेखा आहेर, अर्जुन पळसकर, ज्ञानेश्वर मगर, हर्षा पवार, रूपाली चोपडे, वर्षा भाले या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

किड्सकेंब्रिज स्कूल
संस्थेचेसंचालक गोविंद गोंडे यांच्या यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक नीलेश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होेती. विद्यार्थांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरला रोडगे, सुनीता जगताप, शालू रोठरिया, हर्षदा पाटील, पूनम तेलंग, शीतल चौधरी, प्रीती बिस्वास, वासवी राधेश्याम आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिल्पा व्यवहारे यांनी केले, तर आभार पल्लवी पाईकराव यांनी मानले.

नृसिंहविद्या मंदिर प्राथमिक शाला
ध्वजारोहणसंस्थेचे अवनिाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक एस. गायके, एम. राठोड, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर बोरकर, सिद्धेश्वर ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वामीविवेकानंद विद्यालय
शालेयसमितीचे अध्यक्ष बबनराव चौरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जनार्दन दांडगे यांनी २५ चटया भेट दिल्या. मुख्याध्यापक चंद्रकांत धुपे, लक्ष्मण लांडे पाटील आदी उपस्थित होते.

ग्रेडइंडियन पब्लिक स्कूल
पोलिसनिरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शशिकांत थेटे, अनिरुद्ध जगताप, रवींद्र पवार, व्ही. व्ही. जाधव, मोहन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थांनी लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने िजंकली. कृती वर्मा, सिजा मथाई, पुण्यवती तट्टवर्ती, मीरा कदम, निर्मला इंगळे, रिंकू चटर्जी, शिल्पा उबाळे, संगीता थोरात, अमिता धुंदाळे, नंदनिी आहेर आदींनी परिश्रम घेतले.स्वातंत्र्य दिनानिमित्त किड्स केंब्रिज शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा केली होती.