आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Blog : तरुणांनो असा साजरा करा स्वातंत्र्य दिन, औरंगाबादच्या तरुणांचे छोटे पण कौतुकास्पद काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण देशात सोमवारी भारताचा 70 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून शहिदांना वंदन करून स्वातंत्र्यदिन साजरा झाला. पण देशाच्या तरुणाईने या दिवशी काय केले हे अत्यंत म्हत्त्वाचे आहे. कारण आपला देश सध्या जगातील सर्वात तरुण देश आहे. त्यामुळे तरुणाईवर नजर असणे गरजेचे आहे. औरंगाबादेत एकिकडे हुल्लड करणाऱ्या तरुणाईचा देशप्रेमाचा दिखावा पाहून वाईट वाटत असले तरी दुसरीकडे काही तरुणांनी या दिवसाचे औचित्य साधून केलेल्या कामाने सगळीच तरुणाई आलबेल नसल्याचे समाधानही दिली.

सोमवारी स्वातंत्र्य दिनी औरंगाबादच्या रस्त्यांवर नजारा कसा होता याचा उल्लेख करायचा झाल्यास फारसे चांगले वाटेल असे बोलण्यासारखे काही दिसले नाही. गाड्यांवर ट्रीपलसीट बसून वेगाने गाड्या चालवत, हातात मोठे मोठे राष्ट्रध्वज घेऊन धावत्या गाड्यांवर उभे राहणारे आणि घोषणाबाजी करणारे तरुण हे आपल्या देशाचे भविष्य आहेत का याचे मनाला वाईट वाटत होते. त्यात कॅनॉट, गुलमंडी सारख्या परिसरातील चित्र तर आणखीच वाईट. केवळ हुल्लडबाजी म्हणजे देशभक्ती का असा विचार पडावा. हे सर्व पाहून वाईट वाटत होते. कारण आपला देश जगातील सर्वात तरुण देश. अशा सर्वात तरुण देशातील तरुणाईकडून आपल्याला कितीतरी अपेक्षा अाहेत त्यामुळे हे सर्हिव पाहिल्यानंतर वाईट वाटणारच.

एकिकडे तरुणाईच्या स्वातंत्र्यदिनाच्या अशा जल्लोषाने मन दुःखी झालेले असतानाच आज म्हणजे मंगळवारी फेसबूकवर एक पोस्ट पाहिली आणि हायसे वाटले. तरुणांमध्येही सगळीकडेच आलबेल वातावरण नसल्याचे जाणवले. या पोस्टमध्ये तरुणांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रस्त्यावर फिरणाऱ्या एका गरीब वृद्धाला परिस्थितीमुळे त्याच्यावर ओढावलेल्या पारतंत्र्यातून मुक्त केले. त्याच्या जीवनाचा जणू कायापालटच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

औरंगाबादधील तरुण नेते निलेश राऊत यांनी ही घटना फेसबूकवर पोस्ट केली. राऊत यांच्या कार्यालयाशेजारी अनेक दिवसांपासून एक अत्यंत फाटक्या अवस्थेतील माणूस बसत होता. कदाचित तो भिकारी असावा. त्याच्या केसांच्या अक्षरशः जटा तयार झालेल्या. अवस्थाही अगदी वाईट. पण आपल्या दुकानाजवळ असा एक व्यक्ती कायम बसलेला असतो आणि आपण त्याच्यासाठी काहीही करू शकत नाही याचे राऊत आणि त्यांच्या मित्रांना वाईट वाटत होते. अखेर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राऊत आणि त्यांच्या मित्रांनी त्याचा कायापालटच करून टाकला. विशेष म्हणजे त्याचा चेहरामोहरा बदलल्यानंतर त्याची मनपाच्या निवारागृहात राहण्याची सोयही केली. या तरुणांची नावे समजू शकली नाहीत, केवळ नीलेश राऊत यांच्या पोस्टमुळे ही बातमी समजली आणि ती सर्वांना समजावी असे वाटल्याने या ब्लॉगच्या माध्यमातून मांडली आहे.

तरुणांनी या सर्वांचा आदर्श घेऊन स्वातंत्र्यदिनी असे काही तरी केल्यास आपल्याला महाशक्ती बनण्यासाठी काय करायचे हे कोणी सांगण्याची गरजच राहणार नाही ते शिखर आपण सहजच गाठू शकतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त कुठे फळे वाटप, वह्या पुस्तके वाटप, गरीबांना मदत असे विविध कार्यक्रम करण्यात येतात. हे कार्यक्रम करण्यात काहीही वाईट नाही, मात्र या तरुणांनी केले अशा प्रकारचे काही तरी काम झाल्यास मनाला मिळणारा आनंद वेगळाच असतो. अगदी आपला काम करणाऱ्याशी किंवा लाभार्थींशी काहीही संबंध नसला तरीही.. त्यांना स्वतःला किती समाधान लाभले असणार हे आपण सांगूच शकत नाही.. ते अनुभवण्याचे स्वातंत्र्य त्या तरुणांनी काल उपभोगले एवढे मात्र खरे...
पुढील स्लाइड्सवर पाहा, निलेश राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिस्थितीच्या पारतंत्र्यातून कशाप्रकारे केली या व्यक्तीची सुटका PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...