आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमी साजरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांत ६८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी कसरती, कवायतींबरोबर लेझीमचे आकर्षक सादरीकरण केले. देशभक्तिपर गीत गायन, समूहगीत, भाषणातून देशभक्तीचे महत्त्व पटवून देण्यात आले. पथनाट्यातून पर्यावरण जनजागृती करण्यात आली. नाटक, समूहनृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले.

राधाकृष्ण विद्यालय
अध्यक्षस्थानी डी. व्ही. अंकमुळे हे होते. नगरसेवक बाळासाहेब मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी एन. के. गायकवाड, मुख्याध्यापिका एस. आर. गादीमोड, जी. के. हरकळ उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर पथनाट्य सादर केले. सूत्रसंचालन शीला इंगळे, तर आभार व्ही. एम. कानडे यांनी मानले.
एमजीएम वस्तानवी उर्दू शाळा
माजी नगरसेवक तथा माजी शिक्षण आरोग्य सभापती रणधीरसिंह हुलीम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी साजिद पाशा उपस्थित होते. मुख्याध्यापिका अजरा खान यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन मसरत अमरीन, तर आभार समरीन बुतूल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी काजी कानीज, शेख फरहा परवीन आदींनी परिश्रम घेतले. मुलांना या वेळी खाऊ वाटप करण्यात आला.

कॅम्पियन इंग्लिश स्कूल
शाळेचे अध्यक्ष आनंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. चिमुकल्यांनी आपल्या स्तुप्त गुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका माधुरी मंडलिक, कविता शिंदे, ललिता कुलकर्णी, कृष्णा बसीन, प्रियंका
देवकर यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन कृष्णा बसीन यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
उस्मानपुरा परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शांती आणि अमन यांचे प्रतीक म्हणून आकाशात कबुतरे व फुगे सोडून सुख, समृद्धी, एकता, सद््भावना व शांतीचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम शहर सचिव शेख जुबेर, शेख रफिक, शहर अध्यक्ष विनोद बनकर, नगरसेवक अक्रम पटेल, जावेद खान, रफिक, मोहंमद मेराज, शेख मतीन, मोबीन शेख, शेख आसिफ, इरफान हुमेर, वसीम, रहेमान, समीर, सोहेब खान, नवीन ओबेरॉय आदी उपस्थित होते.
डायमंड इंग्लिश स्कूल
सातारा परिसरातील डायमंड इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे मारुती फ्रूट्स कंपनीचे संचालक विलास धलकरी, संजय हिस्वणकर उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी कवायती, देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. शाळेचे संचालक बी. बी. नालमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती आंचळकर, तर आभार अंजली परदेशी यांनी मानले.
श्री श्री रविशंकर बालक मंदिर
एन-४ येथील श्री श्री रविशंकर बाल मंदिर शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. प्रमुख पाहुण्या स्वातंत्र्य सेनानी ताराबाई लड्डा यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच सुनीता पाठक यांनी मुलांना चॉकलेट वाटप केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतगायन केले. या वेळी प्रशासक प्रकाश पिंपळे, प्राचार्या जयश्री देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सूत्रसंचालन अश्विनी नातू, तर आभार शोभा लड्डा यांनी मानले.

रिव्हरडेल हायस्कूल :
विश्वस्त राघवेंद्र जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शाळेचे संचालक पी. व्ही. सोळुंके, आर. जे. फाउंडेशनचे शैक्षणिक संचालक डॉ. राव उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर समूहगीत स्पर्धेत सहभाग नोंदविला. एकांकिका, नाटक, समूहनृत्य, समूहवादन, विविध कसरती, कवायतींचे प्रदर्शनही केले. तसेच संगीत विषयात शंभर मार्क मिळविलेल्या आदर्श शहा व निनाद कुलकर्णी यांचा सत्कार केला. प्राचार्य डॉ. बसंतकुमार यांनी मुलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ऐश्वर्या पवार, सायेशा जाधव, अजिंक्य वेरूळकर, निकिता नरवाडे, गणेश तरटे यांनी केले, तर आभार उपप्राचार्या गुजर यांनी मानले.
श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेचे उद््घाटन मनपा स्थायी समितीचे सभापती विजय वाघचौरे, शाळेचे मुख्याध्यापक रमेश भणगे यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेत श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयातील प्रशांत रोडे, जागृती विद्यालयाची दिव्या पातरकर द्वितीय, सरस्वती भुवन विद्यालयाचा पार्थ बावस्कर तृतीय, तर रांगोळी स्पर्धेत आ. कृ. वाघमारे प्रशालेचा नागेश कानडे प्रथम, शारदा मंदिर प्रशालेची भक्ती निर्मळ द्वितीय, जागृती हायस्कूलची संजना तेलतुंबडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत परीक्षक डॉ. हरी कोकरे, मोहिनी रोजेकर, सुरेश मेश्राम, रिता दुबे, फारूख शेख होते. सूत्रसंचालन दिनेश विसपुते यांनी केले.
आदर्श इंग्लिश स्कूल
शाळेच्या संचालिका रंजना मिरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्ताने फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता संधासह शिक्षकांची उपस्थिती होती.
विद्यानिकेतन प्राथमिक शाळा
अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पी. एन. गाडेकर, लोंढे, खरात उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सहशिक्षिका औटे, नराटे, तांबे, मते, कुंटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी संतोष गाडेकर, सूरज उकरंडे, अविनाश गायकवाड, सतीश कांबळे, दत्ता गाडेकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रमोद वैराळ, तर आभार तायडे यांनी मानले. एम. एस.
पब्लिक स्कूल
कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संदीप शिंगणे, सुदर्शना जाधव, एल. एस. शिंगणे आदी उपस्थित होते. या वेळी प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन, प्रास्तविक व आभार शुभांगी येवले, शिंदे यांनी केले.
नेताजी सुभाष हायस्कूल
जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड. स्मिता जबडे यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एम. एम. भोकरे पाटील, संस्थेचे सचिव एन. एस. आदके, सदस्य ए. ए. मोहरीर उपस्थित होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शनात एन. एस. आदके यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वातंत्र्याचा रक्तरंजित इतिहास मांडला. तसेच दहावीच्या वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन अमोल काथार, तर आभार दिनेश चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सहशिक्षक शेख, ए. वाय. पटेल आदींनी परिश्रम घेतले.
मॉडर्न महाविद्यालय
हडको परिसरातील मॉडर्न कॉलेजमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग सोनकांबळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कोशाध्यक्ष एन. एस. बनसोडे, प्राचार्य मो. साद, रेणुका देशपांडे, श्रुती क्षीरसागर, प्रा. मिर्झा सलमा, प्रा. सय्यदा आयेशा, प्रा. पूनम खांडेभराड, बी.के. तायडे, कृष्णा मानकर उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी पांडुरंग सोनकांबळे, प्राचार्य मो. साद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात आभार प्रा. रेणुका देशपांडे यांनी मानले.
ओंकार विद्यालय
प्रमुख पाहुणे म्हणून त्रिमूर्ती ग्रुपचे संचालक अतुल बंगीनवार, अनुपम आयुर्वेद फार्मसीचे संचालक डॉ. शिवकुमार गोरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजीव सावजी, सचिव डॉ. नितीन बापट, श्रीकांत दरख, मुख्याध्यापिका ज्योती देशपांडे आदींची उपस्थिती होती. मुलांनी संचलन, लेझीम, कवायती सादर केल्या.
खंडपीठात ध्वजारोहण
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी 7 वाजता झाले. यानिमित्त खंडपीठातील उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. शिंदे, न्या. एम. टी. जोशी, न्या. एस. व्ही. गंगापूरवाला, न्या. आर. व्ही. घुगे, न्या. एस. पी. देशमुख, न्या. ए. एम. बदर, न्या. व्ही. के. जाधव, न्या. पी. बी. वराळे, न्या. श्रीमती एस. एस. जाधव यांच्यासह सेवानिवृत्त न्यायमूर्ती सर्वश्री एन. व्ही. दाभोळकर, एस.पी. डावरे, ए.बी. नाईक, के.व्ही. चांदीवाल, व्ही.आर. किनगावकर, निबंधक व्ही.एस. कुलकर्णी, पी.डी. डिग्रसकर, उपनिबंधक बी.डी. देशपांडे, एस.डी. धोंगडे, डी.आर. कुलकर्णी, ए. व्ही. बक्षी, शेख रियाज यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
घाटीत रक्तदान शिबिर
आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे प्राचार्य डॉ. जी. पी. चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी शिबिरात डॉ. गोविंद चौधरी, प्राचार्य डॉ. नागेश सावरगावकर, वैद्यकीय अधिकारी संतोष जेऊरकर, सांख्यिकी सहायक किशोर जोहरे, दीपक जंगम यांनी रक्तदान केले. या वेळी बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पी. एन. सोनवणे, पी. बी. बळेगावरकर, एन. आर. अवधूत, एम. व्ही. जाधव, ए. ए. शेख, एस. एस. सानप, जी. आर. दुरोळे, जे. बी. कुंठे, के. एस. राऊत, डी. पी. दुसाणे, व्ही. जी. जमधडे, एम. आर. खेडकर, टी. व्ही. वायाळ, आर. डी. लवटे यांनी सहभाग घेतला. शिबिर यशस्वितेसाठी एकनाथ भोसले, एम.बी. चौगुले, एल.के. परदेशी, वाय.ई. बनवाले, एस.एम. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
अखिल महाराष्ट्र बांधकाम ठेकेदार कामगार संघटना
संस्थापक अध्यक्ष सलीम शहा, त्यांचे सहकारी आणि कामगार मंडळातर्फे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दार्थ पुस्तक, वह्या, पेन, पेन्सिल असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष रमजान शहा, जिल्हाध्यक्ष मुनीर शहा, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कांताबाई अहिरे, शहराध्यक्ष अ‍ॅड. सुनीता नगरकर, शीला शिरसाट, मनवर शहा, फतरू शहा, शहराध्यक्ष जवाहर भगुरे, प्रमोद गायकवाड, हुसेन शहा, फेरोज शहा, शहानूर पठाण, नामदेव निकाळजे आदींची उपस्थिती होती.
जयहिंद पब्लिक स्कूल
जयहिंद स्कूल आणि औरा इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी चंद्रिका देशमुख होत्या.
मुख्याध्यापक श्रीनिवासन वेल्दी यांची उपस्थिती होती. या वेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
गणपतराव जगताप विद्यामंदिर
ध्वजारोहण भाऊसाहेब जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. वि द्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले. एस. जी. देशमुख आणि अमोल मंदाडे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राकेश गांगुर्डे होते. प्रमुख पाहुणे म्हणून के. डी. वनारसे,
वलेकर यांची उपस्थिती होती. आभार व्ही. एन. खोमणे यांनी मानले.

अण्णारावजी पाटील शि क्षण संस्था
कन्या विद्यालय संस्थेचे सचिव सूर्यभान शिंदे, उपाध्यक्षा अनसूया शिंदे, मुख्याध्यापिका एम. आर. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन सी. ए. सोनवणे यांनी तर आभार एस. एम. कुबेर यांनी मानले.
ज्ञानज्योत स्कूल
नगरसेवक नारायण कुचे, बाबासाहेब डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी नगरसेविका नीला जगताप उपस्थित होत्या. या वेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तिपर गीतगायन व भाषण केले. कार्यक्रमात मुख्याध्यापिका अनिता बनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका रेखा भोकरे यांनी केले.