आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Need Coach Like China\'s Coach Who Give Result Says Milkasingh

चीनप्रमाणे रिझल्ट देणारे प्रशिक्षक नेमावेत- मिल्‍खासिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारतात 40 हजार क्रीडा प्रशिक्षक आहेत. तरीदेखील एकही अँथलिट ऑलिम्पिकपदक जिंकू शकलेला नाही. अशा परिस्थितीत जर आपल्याला खरोखरच ऑलिम्पिक पदके जिंकायची असतील तर चीनप्रमाणे रिझल्ट देणारे प्रशिक्षक कॉन्ट्रॅक्टवर नेमावेच लागतील, अशा शब्दांत मिल्खासिंग यांनी भारताला नक्की काय करायला हवे, त्याचे वर्म पत्रकार परिषदेत उलगडले.

आमच्या काळातील कोणत्याही खेळात घडलेले खेळाडू स्वत:च्या बळावरच घडले. कारण, त्या वेळी प्रशिक्षकच नव्हते. मात्र, आता अन्य देश बहुतांश खेळांमध्ये खूप पुढे गेले असल्याने ‘कोचेस ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस’ हेच तत्त्व बाळगावे लागेल, असेही मिल्खासिंग यांनी सांगितले. बालपणापासूनच मुले एका ठिकाणी ठेवून त्यांच्यावर प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. मुले जितकी मेहनत घेतील, त्याच्या दुप्पट मेहनत प्रशिक्षकांना घ्यावी लागणार आहे, तरच पदकांची आशा असल्याचेही ते म्हणाले.

भारताच्या खेळाडूंमध्ये मेहनत आणि चिकाटीची उणीव
भारताच्या खेळाडूंमध्ये मेहनत घेण्याची तयारी आणि चिकाटीची उणीव जाणवते. मी तर अगदी पायातून रक्त येईपर्यंत धावायचो. मुले तितकी मेहनतच करत नाहीत आणि प्रशिक्षकही त्यांच्याकडून ती करून घेताना दिसत नाहीत. मग अशा परिस्थितीत मी देशातील सरकारला दोष देणार नाही. त्यांनी जितका पैसा द्यायचा, तितका देण्याची तयारी दाखवल्यावर तरी मेहनत घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

मॅचफिक्सिंग करणार्‍यांवर ‘लाइफबॅन’ लावायला हवेत
आमच्या काळात खेळांमध्ये पैसा अजिबात नव्हता. त्या काळी आम्ही केवळ टाळ्यांसाठी खेळायचो. त्या तुलनेत आता लक्षावधी रुपये मिळतात. तरीदेखील झटपट पैसा मिळविण्यासाठी खेळाडू मॅचफिक्सिंग व अमली पदार्थांच्या मोहात पडतात. अशी गैरकृत्ये करणार्‍या खेळाडूंवर ‘लाइफबॅन’ लावायला हवेत, असेही मिल्खासिंग म्हणाले. आपल्या एका चुकीमुळे आपल्या देशाची बदनामी होणार असेल अशा कृत्याच्या मोहात पडूच नये, असेही ते म्हणाले.