आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : भारतातील \'त्‍या\' दंगलीत झाले होते 10 लाख ठार; 1.45 बेघर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दिल्‍ली / औरंगाबाद - 14 ऑगस्‍ट 1947 रोजी भारताची फाळणी होऊन देशाचे दोन तुकडे झाले. त्‍यावेळी देशात ठिकठिकाणी दंगली उसळल्‍या होत्‍या. यामुळे तब्‍बल 1.45 कोटी लोक प्रभापित झाले तर 10 लाखांच्‍या आजपास नागरिकांना हिंसाचारामध्‍ये जीव गमवावा लागला. त्‍यातील हजारो लोकांचे मृतदेह अंत्‍यसंस्‍काराविना कुजून नष्‍ट झाले. प्राणी, गिधाड यांनी मृतदेहाचे लचके तोडले. लाखो मुलं या दंगलीत अनाथ झाले तर मुस्‍लीम बहुसंख्‍य असलेली गावेच्‍या गावे उजाड झालीत. या घटनेला आता बरोबर 68 वर्षे पूर्ण झालीत. मात्र, जखमा अजून ताज्‍या आहेत.
अशी झाली फाळणी
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून 1906 साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लिग पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून, असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत महम्मद अली जिन्ना यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धांतास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धांत पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट 1946 साली कलकत्यात 'थेट कृतीदिना'चे आयोजन केले. पण, त्‍यामुळे उसळलेल्‍या दंगलीत 5 हजार लोक ठार झाले होते. येथून फाळणीला बळकटी मिळाली.
फाळणीची प्रक्रिया
प्रत्यक्ष फाळणी प्रक्रिया 'मांउटबॅटन योजने'खाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिका-याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत भारताचा स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात ब्रिटिश सरकारला अंकित असलेल्या ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. या तरतुदीमुळे काश्मिर समस्येचा उदय झाल्‍याचे म्‍हटले जाते.
फाळणीचे परिणाम
हिंदू-मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची परिणिती होती. याशिवाय फाळणीचे अनेक पडसाद नंतरच्या काळात उमटत राहिले. ते पुढील प्रमाणे
- नवनिर्मित पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.
- पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून १९७१ साली बांग्लादेश उदयाला आला.
- भारतात स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदूमुस्लिमांत भीषण दंगे घडले. (२००१ गुजरात हत्याकांड/ १९९२ मधील मुंबईची दंगल)
- भारत व पाकिस्तान मध्ये चारदा युद्ध झाले.
- जम्मू व काश्मीरमधील फुटिरयावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद
- ईशान्य भारतामधील फुटीर चळवळी
- उर्दू भाषिकांच्या मोठ्या स्थलांतरामुळे जन्माला आलेली मुहाजिर आंदोलन
पुढील स्‍लाइड्वर पाहा फाळणी काळातील विदारक फोटोज...