आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND v AUS टेस्ट: कांगारूंकडे 48 धावांची आघाडी, दुसऱ्या दिवशी झाल्या केवळ 197 धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - मॅट रेनशॉ (६०) आणि शॉन मार्श (६६) यांच्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ४८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेऊन टीम इंडियावर दबाव वाढवला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ बाद २३७ धावा काढल्या होत्या. त्या वेळी विकेटकीपर मॅथ्यू वेड २५ आणि मिशेल स्टार्क १४ धावांवर खेळत होते. भारतीय गाेलंदाजांनी अत्यंत चांगली गोलंदाजी केली. मात्र, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सांभाळून खेळ करताना दुसऱ्या दिवशी १९७ धावा काढल्या. भारताकडून डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने १७ षटकांत ४९ धावांत ३ गडी बाद केले.   

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन खास कामगिरी करू शकला नाही. त्याने ७५ धावांत १ विकेट घेतली. वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने पाहुण्या संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. त्याने २३ षटकांत अवघ्या ३९ धावा देऊन १ विकेट घेतली. उमेश यादवने ५७ धावांत १ विकेट घेतली.  
 
पहिल्या सत्रात २९ षटकांत ४७ धावा, २ विकेट : तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने सकाळी बिनबाद ४० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने २९ षटकांच्या  खेळात डेव्हिड वॉर्नर (३३) आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ (८) यांच्या विकेट गमावून केवळ ४७ धावा काढल्या. वॉर्नरला अश्विनने त्रिफळाचीत केले तर स्मिथला जडेजाने यष्टिरक्षक साहाकरवी झेलबाद केले.  
 
मॅट रेनशॉ, मार्शचे अर्धशतक : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रात ३ विकेट गमावून ७६ धावा काढल्या. तिसऱ्या सत्रात पाहुण्या संघाने १ विकेट गमावून ७४ धावा जमवल्या. सलग दुसऱ्या डावात कठीण खेळपट्टीवर अर्धशतक ठोकणारा युवा सलामीवीर मॅट रेनशॉ रवींद्र जडेजाला पुढे येऊन मारण्याच्या नादात यष्टिचीत झाला. रेनशॉने १९६ चेंडूंत ५ चौकार, १ षटकार ठोकत ६० धावा काढल्या. यानंतर हँडसकोम्ब १६ धावा काढून बाद झाला. हे दोघे बाद झाल्यानंतरसुद्धा कांगांरूनी संघर्ष कायम ठेवला. शाॅन मार्शने कसोटी करिअरचे सहावे अर्धशतक पूर्ण केले. चहापानाच्या आधी अखेरच्या चेंडूवर ईशांतने मिशेल मार्शला पायचीत केले. तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने शॉन मार्शची एकमेव विकेट गमावली. त्याला उमेश यादवने बाद केले.   

अश्विनचा अप्रतिम झेल : जडेजाच्या गोलंदाजीवर पीटर हँडसकोम्बला अश्विनने हवेत सूर मारून झेल घेत बाद केले. अश्विनने हवेत उडी मारून अशक्य वाटणारा झेल घेतला. 
 
ईशांतने स्मिथला चिडवले
ऑस्ट्रेलियाच्या स्टिवन स्मिथचे लक्ष विचलित करण्यासाठी ईशांत शर्माने त्याला वाकडे तोंड करून चिडवले. मात्र, चाहत्यांना ईशांतची ही कुरापत आवडली नाही. िट्वटरवर चाहत्यांनी त्याची फिरकी घेतली. ‘ईशांतने आज खरे टॅलेंट दाखवले. त्याने गोलंदाजी सोडून अभिनय केला पाहिजे. त्याने बॉलीवूड आजमावले पाहिजे,’ असे चाहत्यांनी म्हटले. ईशांतचा वाकडा चेहरा बघून कोहलीसुद्धा हसला.
 
आर. अश्विनचा  षटकांचा विक्रम
अश्विनने या सामन्यात आतापर्यंत ४१ षटके गोलंदाजी केली आहे. यासह त्याने एका सत्रात सर्वाधिक षटके गोलंदाजी करण्याचा भारतीय विक्रम आपल्या नावे केला. या सत्रात अश्विनने आतापर्यंत ६२२ षटके गोलंदाजी केली आहे. याअाधीचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावे होता. कुंबळेने २००४-०५ च्या सत्रात ६१२ षटके गोलंदाजी केली होती.
 
भारतीय इनिंग...
- लोकश राहुल (90) धावांची खेळी करून बाद झाला.
- नायन लियोनच्या बॉलवर अजिंक्य राहणे 17 रन बनवून बाद झाला.
-   नाथन लियोनच्या बॉलवर कर्णधार विराट कोहली lbw बाद झाला.
- खराब सुरूवात झालेल्या टीम इंडियाने लंचपुर्वीच दोन विकेट गमावल्या होत्या.
- पहिलाच अंतराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आलेला अभिनव मुकुंद आणि चेतेश्वर पुजारा दोघेही लंच आधीच बाद झाले.
- 2.5 ओव्हमध्ये खाते न उघडता स्टार्कच्या बॉलवर अभिनव मुकुंद lbw बाद झाला.
- लंचच्या एक ओव्हर आधी (27.5) नाथन लियोनच्या बॉलवर पुजारा (17) हॅट्सकॉम्बच्या हातात झेल देऊन बाद झाला.
 
बंगळुरूत असे आहे भारताचे रेकॉर्ड...
- बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाचे फिफ्टी-फिफ्टीचे रेकॉर्ड आहे.
- भारताने या मैदानावर 21 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामने जिकले, तर 6 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 9 सामने ड्रॉ राहिले आहेत.
- ऑस्ट्रेलियाने या मैदानावर 5 कसोटी सामने खेळले आहे, त्यातील 2 सामण्यात ऑस्ट्रेलिया संघ विजयी राहिला आहे.
- ऑस्ट्रेलियाने ऑक्टोबर 2004 मध्ये भारताला याच मैदानावर 217 रनने हरवले होते.
- भारताने 6 वर्षानंतर ऑक्टोबर 2010 मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने हरवून पराभवाचा बदला घेतला होता.  
 
दोन्ही संघ:
भारत-
लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, करुण नायर, आर. अश्विन, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, उमेश यादव आणि इशांत शर्मा.

ऑस्ट्रेलिया- डेविड वॉर्नर, मेच रॅनशॉ, स्टीव स्मिथ, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड, मिशेल स्टार्क, स्टीव ओकीफे, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.
 
पुढील स्लाइडवर पाहा पहिल्या दिवसाचा डाव कसा रंगला...?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...