आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Government, Samsung Join Hands For Technical Schools

यंदापासून औरंगाबादेत टेक्निकल स्कूल; सॅमसंग या कंपनीशी सामंजस्य करार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील युवकांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) देशभरात टेक्निकल स्कूल (तंत्र विद्यालये) स्थापन करणार आहे. यासाठी मंत्रालयाने सॅमसंग या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. यंदा देशात 10 ठिकाणी ही तंत्र विद्यालये सुरू होणार असून त्यात औरंगाबादसह मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, वाराणसी, भुवनेश्वर, लुधियाना, नवी दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे.

सोमवारी एमएसएमई मंत्रालय आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स यांच्यातील करारावर स्वाक्षरी झाली. त्या वेळी एमएसएमई मंत्री कलराज मिश्र आणि सॅमसंगचे सीईओ (नैर्ऋत्य आशिया) बी. डी. पार्क उपस्थित होते. मिश्र यांनी सांगितले, उद्योग क्षेत्रातील गरजेनुसार युवकांना प्रशिक्षण देण्याची मंत्रालयाची योजना आहे. या करारानुसार वर्षाकाठी 10 हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तंत्र विद्यालयात सॅमसंगच्या अ‍ॅडव्हान्स रिपेअर अँड इंडस्ट्रियल स्किल्स प्रोग्रामचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत युवकांना मोबाइल फोन, टीव्ही, होम थिएटर, घरगुती उपकरणे आणि त्यासाठी लागणारे साहित्य आदी उत्पादनांच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
रोजगाराच्या संधी :
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या वाढीसाठी पोषक वातावरण भारतात आहे. या क्षेत्रातील आघाडीची कंपनी या नात्याने सॅमसंगने केंद्राशी हा करार केला आहे. : बी. डी. पार्क, सीईओ, सॅमसंग

तीन महिन्यांचे सत्र
प्रत्येक अभ्यासक्रम तीन महिन्यांचा -शुल्क 20 हजार रुपये -आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना सरकारतर्फे बँक कर्ज -सत्र पूर्ण झाल्यानंतर सॅमसंग किंवा इतर कंपन्यांत नोकरीची संधी -स्वत:चा उद्योग उभारणीसाठी उपयुक्त

औरंगाबादच का?
औरंगाबादेतील लघु व मध्यम उद्योगांचे जाळे, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि या तंत्र विद्यालयातून बाहेर पडणार्‍यांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी यामुळे देशातील पहिल्या 10 केंद्रांत औरंगाबादचा समावेश करण्यात आला आहे.