आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयएमसाठी हालचालींना वेग, औरंगाबादच्या उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसाठी (आयआयएम) महाराष्ट्रात योग्य जागेची पाहणी करा, असे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव अमरजित सिन्हा यांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांना पत्राद्वारे दिले असून आयआयएमसाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या उद्योजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे आयआयएम औरंगाबादलाच मंजूर करावे, असे निवेदन पाठवले आहे. सीएमआयएच्या माध्यमातून उद्योजकांनी गेल्या 7 महिन्यांपासून आयआयएमसाठी प्रयत्न चालवले आहेत. काही दिवसांतच केंद्राचे एक पथक शहरात 200 एकर जागेची पाहणी करण्यासाठी येईल. तत्पूर्वी त्याला राज्याची परवानगी लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. शिवाय त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचेही प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत.
पाहणी करणार
उद्योजकांनी वाल्मी किंवा शेंद्रा ही ठिकाणे जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे सुचवली आहेत. उद्योजक, जिल्हाधिकारी व राज्य शासनाचे तंत्रशिक्षण सहसंचालक महेश शिवणकर हे याबाबत पाहणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबादच योग्य
दोनशे एकर जागा, विमानतळ, बस-रेल्वेची कनेक्टिव्हिटी हे आयआयएमचे नियम आहेत. या निकषात औरंगाबाद शहर बसते. शिवाय अजिंठा, वेरूळ ही जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे जवळ असल्याने औरंगाबादच आयआयएमसाठी योग्य शहर आहे.वेगवान हालचाली सुरू झाल्या.मुख्यमंत्र्यांनी फक्त दुजोरा दिला तर शहरात ती संस्था येईल. आशिष गर्दे, उपाध्यक्ष, सीएमआयए.