आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळावर मिळेल इंडियन, जपानीज फूड, शहरात येणाऱ्या पर्यटकांची होणार सोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळावर देशी-विदेशी पर्यटक दाखल झाल्यानंतर तेथे नाष्टा, जेवणाची व्यवस्था नव्हती. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड व्हायचा. ही बाब लक्षात घेत विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने एक मेपासून रेस्टॉरंटची सुरुवात करण्यात आली. त्यात इंडियन, जपान, थायलंड येथील पदार्थ मिळत आहेत.

प्राधिकरणाकडून मागील पाच वर्षांपासून रेस्टॉरंट उभारण्यासाठी दरवर्षी टेंडर काढण्यात येत होते.हॉटेल अजंता अॅम्बेसेडरने येथे रेस्टॉरंट उभारण्याची तयारी दर्शवल्यानंतर मान्यता देण्यात आली. सकाळी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गरम पोहे मिळणार आहेत. विदेशी पर्यटकांसाठी काँटिनेंटल फूड, बिर्याणी, पिझ्झा, बर्गर, उपमा, पनीर बटर, स्प्रिंग रोल, थाय स्वीट, चल सॉस असे विविध खाद्यपदार्थ उपलब्ध करण्यात आले. रेस्टॉरंटमध्ये ५०० ते ७५० रुपये दर आकारून व्यावसायिक कार्डची व्यवस्था करण्यात आली. त्या बदल्यात चहा, नाष्टा, पिण्याचे पाणी, वायफाय सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. चीन, तैवान, थायलंड, जपान येथून येणाऱ्या प्रवाशांच्या पाहुणचाराची व्यवस्था करण्यात आल्याचे रेस्टॉरंटचे प्रमुख मानव कक्कड यांनी सांगितले. रविवारी (एक मे) उद्योजक ऋषी बागला यांच्या हस्ते या रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय उपस्थित होते.

कार्गो सेवा १० मे रोजी
१०मे रोजी देशांतर्गत कार्गो विमानसेवा सुरू होणार असल्याचे वार्ष्णेय यांनी सांगितले. मागील आठवड्यात बीसीएएस सिक्युरिटी विभागाचे सहायक आयुक्त बी. पी. शर्मा, एअरपोर्ट डायरेक्टर, सीआयएसएफचे अधिकारी, कॅप्टन एस. के. मलिक यांनी विमानतळाचे ऑडिट केले. त्यांची मान्यता मिळाली.
बातम्या आणखी आहेत...