आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमधून सुटलेला जवान चंदू चव्हाण मुळ गावी परतणार, गावकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण उद्या धुळ्यात परतणार आहे. - Divya Marathi
पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण उद्या धुळ्यात परतणार आहे.
नवी दिल्ली- पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण उद्या (शनिवारी, 11 मार्च) धुळ्यात परतणार आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे स्वतः चंदूला मुळगावी घेऊन येणार आहेत. चंदू गावी परतणार असल्याने बोरविहीर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोण आहे चंदू चव्हाण... 
- चंदू मुळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा आहे. 
- 2012 मध्ये चंदू सैन्यात भरती झाला. 
- 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये चंदू तैनात असून, जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. 
- 29 सप्टेबरला चंदूने चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. तेव्हा त्याला पाकिस्तानीजवानांनी अटक केली होती.
- चंदूला पाकिस्तान अटक झाल्याचे समजता त्याच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. 

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे चंदू आला परत...
- चंदू चव्हाणला मायदेशात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते.
- संरक्षण खात्याने केलेल्या योग्य वाटाघाटीमुळे चंदूला परत आणण्यात यश आले.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरही चंदू चव्हाणला परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते.
- अखेर 21 जानेवारीला पाकिस्तानने चंदूला भारताकडे सोपवले होते.

सुटकेनंतर चंदूवर उपचार...
- 29 सप्टेंबरला नजरचुकीने चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता.
- भारतात परतल्यानंतर चंदूला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 
- सध्या चंदूवर अमृतसरच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उचपार सुरु आहेत.
- कैदेत असताना चंदूला पुरेसे अन्नही दिले जात नसल्याचे चंदूच्या भावाने सांगितले आहे.
- भारताच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पाकिस्तानने 4 महिन्यांनी चंदूची सुटका केली होती.
 
पुढीस स्लाइडवर पाहा चंदूचा परिवारासोबतचा फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...