आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian More Interactive Than Chinese , Cope With

चिनी लोकांपेक्षा भारतीय सुसंवादी, समरस होणारे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चिनी नागरिक दुस-या देशातील नागरिकांशी अजिबात बोलत नाहीत; पण भारतीय अगदी भरभरून बोलतात.. मनापासून आणि स्वत:हून बोलतात.. कृपाळूपणा ही तर भारतीयांची खासियतच आहे. भारतीयांचा हा गुण आम्हाला सर्वाधिक भावला. इथे प्रत्येक भागाची नव्हे तर प्रत्येक शहराची संस्कृती अन् जीवनपद्धती चित्तवेधक आहे. वेरुळ-अजिंठा, ताजमहाल आणि पिंक सिटीही ग्रेटच. भारत ख-या अर्थाने ‘इनक्रेडिबल इंडिया’ आहे... अशा मनस्वी भावना विश्वभ्रमणासाठी ‘हाऊस ऑ न व्हील्स’मधून निघालेल्या दोन फ्रेंच कुटुंबीयांनी शहरात व्यक्त केल्या.

फ्रान्सचे नागरिक असलेले पेरीन मायकेल आणि टेम्पे क्लाऊडर सहकुटुंब जुलै 2012 मध्ये पॅरिसमधून निघाले आहेत. कॅराव्हॅन टुरिझम हा त्यांच्या पर्यटनाचा प्रकार आहे. टेम्पे क्लाऊडर हा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेसमध्ये, त्याची पत्नी केरी टेम्पे शिक्षिका, तर मायकेल माहिती क्षेत्रामध्ये व त्याची पत्नी वकील आहे.गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे जगभ्रमण सुरू आहे. जुलै 2013 पर्यंत ते जगभर फिरणार आहेत. 4 ते 13 वयोगटातील त्यांची सहा मुलेही त्यांच्यासोबतच आहे. घरातील सर्वप्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असणारी कॅम्पर व्हॅन ‘हाऊस ऑ न व्हील्स’मधून प्रत्येक कुटुंबाचा प्रवास सुरू आहे. अर्थात दोन्ही कुटुंबांकडे दोन स्वतंत्र व्हॅन आहेत. ब्राझील, चिली, अर्जेंटिना, इस्टलँड आयलँड, पॉलिनिशिया, न्यूझिलँड, ऑ स्ट्रिलिया, चिनमार्गे हे कुटुंबीय सहा जानेवारीला भारतात आले. भारतात ते सर्वप्रथम मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी जयपूर, आग्रा, नवी दिल्ली, जोधपूर, जेसलमेर, बिकानेर आदी शहरांनंतर त्यांनी अजिंठा-वेरूळ लेणींना भेट दिली. दुस-या दिवशी ते औरंगाबादेत पोहोंचले. यानंतर ते पुणे, गोवा, दक्षिण भारत, उत्तर भारत, चेन्नई आदी शहरांमध्ये जाणार आहेत. एका देशातून दुस-या देशात फिरताना चीन वगळता त्यांना कुठेही अडचण आली नाही. चीनमध्ये त्यांना त्यांच्या व्हॅनमध्ये फिरण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्यांची व्हॅन बोटीतच ठेवली आणि संपूर्ण चीन ते तेथील वाहनाने फिरले. भारतामध्ये आल्यावर प्रशासकीय कामांसाठीचे वेटिंग सोडले तर काहीच अडचण आली नसल्याचे पेरिन मायकेल यांनी सांगितले.

औरंगाबादच्या लग्नात आमंत्रण
परदेशी लोकांना भेटण्याची, समजून घेण्याची, संवाद साधण्याची आणि अनुभवांची देवाण-घेवाण करण्याची भारतीयांची जिज्ञासा खरोखर अचंबित करते. विभिन्न खाद्यपदार्थ देणे, आदरातिथ्य करणे, समारंभात बोलावणे असे अनुभव वेगळेच होते. औरंगाबादेतील एका विवाह सोहळ्यात आम्हाला आमंत्रित करण्यात आले होते. असा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतला. फ्रान्समध्ये विवाह सोहळ्याला एवढ्या प्रमणात लोक बोलावले जात नाहीत. शेजा-या नाही लग्नाला बोलावलेच पाहिजे, असे आमच्याकडे नाही. आमच्याकडे 100 लोकांमध्ये जास्त लोक आले तर ती व्यक्ती श्रीमंत समजली जाते, असा अनुभव मायकेलची पत्नी पेरिन सोफी, टेम्पे क्लाऊडर व त्याची पत्नी टेम्पे केरी यांनी सांगितला.

लेणींचे जतन उत्तम; पण कचरा जास्त
अजिंठा-वेरुळ लेणी अद्वितिय आहेत व त्यांचे जतनही उत्तमपद्धतीने केले जात आहे. मात्र लेणींच्या जवळपासच्या गावातील मोठ्या प्रमाणातील कच-या ने मन उदास होते. कचरापेटीही कुठे दिसत नाही. थुंकण्याचे प्रकारही दिसून येतात. त्यातुलनेत चीनमध्ये उत्तम स्वच्छता दिसून येते, असे सांगत स्वच्छता महत्वाची असल्याचे फ्रेंच नागरिकांनी सांगितले.
किचन ते शाळा, सर्वच व्हॅनमध्ये
दोन कोटी 10 लाखांच्या खास व्हॅनमध्ये किचन, बेडरूम, बाथरूम, टॉयलेट, स्टडीरूम, रेस्टरूम अशी सोय आहे. मायक्रोओव्हन, फ्रिज, गॅस, फर्निचर, एअर कंडिशनर, वॉटर टँक, वेस्ट टँक आदी साहित्याने व्हॅन परिपूर्ण आहे. सौरऊर्जेसह इलेक्ट्रो जनरेटरची सोय असल्याने व्हॅन धावू लागताच वीज तयार होते आणि उपकरणे सुरू होतात. भव्य व नियोजनबद्ध व्हॅनमध्ये मुलांसाठी सकाळची दोन-तीन तास शाळा चालते. जुलै ते जुलै असे शैक्षणिक वर्ष असल्याने यंदाच्या वर्षाची मुलांची शाळा व्हॅनमध्ये होणार असल्याचेही सांगण्यात आले.
‘हाऊस ऑ न व्हील्स’ औरंगाबादेत. दिव्य सिटी