आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Pay Attension To Fashion, Technology Mehta

भारतीयांना फॅशन, टेक्नॉलॉजी महत्त्वाची - पर्यावरणतज्ज्ञ मेहता यांची खंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतात दिवसेंदिवस पाण्याचे मुख्य स्रोत नष्ट होत आहेत. जमिनी संपत आहेत. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल सुरू आहे. हे सर्व माहिती असूनही भारतीयांना फॅशन आणि टेक्नॉलॉजी जास्त महत्त्वाची वाटत असल्याची खंत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, मॅगसेसे अवॉर्ड विजेते एम. सी. मेहता यांनी व्यक्त केली.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या वतीने शनिवारी रुक्मिणी हॉल येथे 'रोल ऑफ नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन्व्हॉयर्नमेंट' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. या वेळी सीएमआयचे प्रसाद कोकीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. मेहता म्हणाले की, शैक्षणिक संस्थांनी भविष्याची गरज म्हणून पर्यावरण शिक्षण दिले पाहिजे, अन्यथा सध्याच्या पिढीला याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतील. ग्रामीण भागात गेलेल्या मोठ्या उद्याेजकांनी केलेले प्रदूषण संपूर्ण गाव आजाराने ग्रासलेले तुम्हाला आजही पाहायला मिळेल; परंतु त्या मोठ्या उद्योजकांना त्याची काळजी नाही. वड, पिंपळ यासारखी झाडे आज जागेसाठी तोडली जातात. संस्कृती, परंपरा म्हणून जरी त्या झाडांकडे पाहिले, तरी त्या झाडांपासून २४ तास ऑक्सिजन मिळतो; परंतु त्याच्यावर सर्रास कुऱ्हाड चालवली जात आहे.

दहा वर्षांनी नद्या संपतील : सध्यादेशातील पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या नद्या पूर्णपणे दूषित होत चालल्या आहेत. परिणामी काही नद्यांनी तळ गाठला आहे. परंतु त्याबद्दल कुणीच गंभीर नाही. नद्यांचे प्रदूषण आपण असेच सहन करत गेलो तर येत्या दहा वर्षांत देशातील बहुतांश नद्या संपतील, असा इशाराही मेहता यांनी दिला.

नद्या स्वच्छ करायची गरज नाही : नद्यांनास्वच्छ करायची गरज नसते. नदी स्वत: नैसर्गिक प्रक्रियेने स्वच्छ होत असते. त्यामुळे ती स्वत:हून स्वच्छ झाल्यावर ती पुन्हा घाण होणार नाही, याची आपण काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

प्रत्येकाने वाढदिवसाला फक्त एक तरी झाड लावावे
उपस्थितविद्यार्थ्याने पर्यावरण संवर्धनाचे काम सुरू करण्यासाठी काय करायचे, असा प्रश्न विचारल्यावर मेहता म्हणाले की, पर्यावरण संवर्धनाचे काम सुरू करण्याची गरज नाही. प्रत्येक नागरिकाने फक्त त्याच्या वाढदिवसाला झाड लावून त्या एकाच झाडाची काळजी घेण्याचा निर्धार केला, तरी मोठा फरक पडेल.