आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या क्रांतीकारकाने उखडून फेकले तुरुंगातील गेट, इंग्रज सरकार झाले होते गारद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्रज सरकारविरुद्ध पेटून उठलेल्‍या क्रांतीकारकांमध्‍ये आज अनेक नावं आदरानं घेतली जातात. त्‍यापैकीच एक नाव म्‍हणजे स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक म्‍हणून ओळख असलेले भारताचे थोर क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके. सुरूवातीच्‍या काळात फडके हे इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले होते. पण, मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडके यांना इंग्रज अधिकाऱ्याने रजा दिली नाही. आईचा स्वर्गवास झाला. त्‍यानंतर संतप्त झालेले फडके थांबले नाही. त्‍यांनी ब्रिटिश सरकारच्या धोरणांचा कठोर विरोध केला.
पुढे इग्रजांनी फडके यांना पकडून अरेबियातील एडनच्‍या तुरुंगात पाठवले होते. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी चक्‍क कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून फेकले होते व तुरुंगातून पळ काढला, अशा या थोर क्रांतीकारकाचा आज जन्‍मदिवस. 4 नोव्‍हेंबर 1845 रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात त्‍यांचा जन्‍म होता.
आईचे निधन झाले पण भेटता आले नाही
माध्यमिक शिक्षणानंतर फडके यांनी पुणे गाठले. सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ ते राहत होते. येथे इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत ते भरती झाले. एकदा त्‍यांची आई प्रचंड आजारी होती. आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली. पण इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. यातच फडके यांच्‍या आईचे निधन झाले नि ते आईला भेटूही शकले नाहीत. संतप्त झालेल्या फडके यांनी सरकारी नोकरीला रामराम ठोकला व ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध त्‍यांनी जाहीर भाषणांना सुरूवात केली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा फोटो, वाचा या राष्‍ट्रभक्‍ताच्‍या आयुष्‍यातील काही प्रसंग..
बातम्या आणखी आहेत...