आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indu Mhatre Murder Case Imran Mehandi To Mocca Law

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंदू म्हात्रे खूनप्रकरणी मेहंदीसह 8 जणांना मोक्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: इंदू म्हात्रे खून प्रकरणात इम्रान मेहंदी व गजानन म्हात्रे यांच्यासह इतर आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे.
मंगळवारी सहायक पोलिस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी या प्रकरणाचा अहवाल मोक्का न्यायालयाचे विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांच्यामार्फ त मोक्का न्यायलयात सादर केला. तसेच या आरोपींना अटक करण्याची परवानगीही मागितली आहे. इम्रान मेहंदी व त्याच्या साथीदारास या आधीही तीन प्रकरणांत मोक्का लावण्यात आलेला आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर 2011 दरम्यान मोटार वाहन विभागातील सहायक पोलिस उपनिरीक्षक गजानन म्हात्रे याने इम्रान मेहंदीला त्याची पत्नी इंदूबाईच्या खुनाची सुपारी दिली होती. इम्रान मेहंदी व त्याच्या साथीदारांनी इंदूबाईला रिक्षात बसवून हसरूल सावंगी परिसरात नेले होते. त्यावेळी आरोपींनी इंदूबाईचा गळा आवळून खून करून त्याच परिसरात इंदूबाईचा मृतदेह पुरला होता. दरम्यान, माजी नगरसेवक सलीम कुरैशी खून प्रकरणात अटक करण्यात आलेले इम्रान मेहंदी व त्याचे साथीदाराकडून चौकशीनंतर हे प्रकरण समोर आले. म्हणून इम्रान मेहंदी, गजानन म्हात्रे, सय्यद नाजेरअली नासेरअली, नुमानखान अब्दुल कय्युमखान, सय्यद जहीर बकर कुरैशी, सय्यद तमकीन ऊर्फ तम्मा, शेख इम्रान ऊर्फ सुल्तान आणि फरीदखान फे रोजखान यांना मोक्का लावण्यात आला.