आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकांनो, डीएमआयसीतील प्लाॅटसाठी असे करा बकिंग, ऑरिक सिटीचे अधिकारी आज देणार प्लॉट वाटपाबाबत माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डीएमआयसी शेंद्रा येथे प्लॉट बकिंग ऑनलाइन असल्याने अनेकांना ते कसे करावे, हे कळत नसल्याच्या तक्रारी शासन दरबारी गेल्या आहेत. त्यामळे आॅरिक सिटी व्यवस्थापनाने काही शहरांत कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरवले आहे. डिसेंबर रोजी एमजीएम महाविद्यालयातील रुक्मिणी सभागृहात सकाळी ११ ते दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे.

२८ नोव्हेंबरपासून ऑरिक सिटी (डीएमआयसी शेंद्रा )येथील ४३ एकर जागेवरील एकूण ४९ प्लाॅटच्या बकिंगसाठी ऑरिक डॉट सिटी या वेबसाइटवर अर्ज करण्याची सविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याच्या तक्रारी शासन दरबारी गेल्याने शासनाने ही प्रक्रिया कशी करावी याचे काही शहरांत प्रेझेन्टेशन ठेवले आहे. पहिले प्रेझेन्टेशन औरंगाबादेत डिसेंबर रोजी होत आहे. यात शेतकरी उद्योजकांसह सामान्यांनाही प्लाॅट बकिंगसाठीची ऑनलाइन प्रक्रिया मोठ्या पडद्यावर समजावून सांगितली जाणार आहे. वेबसाइट कशी उघडावी, त्यात नावनोंदणी कशी करावी, अर्ज कसा भरावा, कादगपत्रे कशी डाऊनलोड करावीत किंवा कागदपत्रे कशी सबमिट करावीत, फी ऑनलाइन कशी भरावी या बाबत ऑरिक सिटीचे महाव्यवस्थापक गजानन पाटील हे मराठी,हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषेत मार्गदर्शन करणार आहेत.

या साठी होतेय कार्यशाळा :
शेेंद्राडीएमआयसीत एकूण ४३ एकर जागा सरुवातीला विक्रीसाठी काढली आहे. या जागेत एकूण ४९ प्लाॅट पाडण्यात आले आहेत. यात दहा ते पंधरा हजार चौ.मी. चे सहा प्लाॅट तर पाच हजार ते अगदी ६१८ चौ.मी इतका सर्वात लहान प्लाॅट असे ४३ प्लॉट आहेत. मोठ्या प्लॉटसाठी काही नियम वेगळे आहेत. मोठ्या प्लाॅटसाठी पाच ते दहा हजार इतकी अनामत रक्कम असून ती परत केली जाणार नाही. तर छोट्या प्लाॅटची रक्कम परत मिळेल, अशी व्यवस्था आहे. अशा अनेक बारीकसारीक सूचनांमळे अनेकजण गोंधळल्याने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

काय आहेत आक्षेप : प्लाॅटविक्री प्रथमच ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने अनेकजण गोंधळले आहेत. अनेक ग्राहक ६०० ते एक हजार चौ.मी चे प्लाट घेण्यास उत्सक आहेत. यात कमी आकाराचे अगदी बोटावर मोजण्याइतके प्लाॅट आहेत. या प्लाटचा लिलाव होऊन ती जागा महागात विकली जाईल. शेतकऱ्यांकडून स्वस्तात घेतलली जागा शासन लिलावाद्वारे कोट्यवधींना विकणार, या प्रक्रियेत श्रीमंत, दलालांचीच चांदी होणार अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

आम्ही अनेकवर्षापासून कुटीर उद्योगांसाठी छोटे गाळे बांधून देतो. असे उद्योजक मोजके आहेत, अशा उद्योगांमळे अनेक कामगार मालक झाले आहेत. परंत, डीएमआयसीत अशा उद्योगांना प्लाॅट मिळण्याची शक्यता मावळली आहे. छोट्या प्लाॅटसाठी अनेक अर्ज आल्याने त्यांचा लिलाव होईल. त्यात पहिल्या पिढीच्या तरुण उद्योजकांना जागाच मिळणार नाही. -किरण दिंडे,अध्यक्ष, दिंडे उद्योग वसाहत, वाळूज
बातम्या आणखी आहेत...