आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 दिवसांच्या मुलीला फेकले विहिरीत, मृत बालिकेसह आईची डीएनए चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद / वाळूज - सुलतानपूर येथील 12 दिवसांच्या बालिकेच्या हत्येप्रकरणी बालिका आणि तिच्या आईची डीएनए चाचणी केली जाणार आहे. मृत बालिका बेपत्ता झालेली बालिका आहे की दुसरीच, हे ओळखण्यासाठी ही चाचणी घेतली जाणार आहे.

सुलतानपूर येथील विजय इथापे यांच्याकडे त्यांची मावस बहीण सोनाली पांडुरंग काकडे (25) ही बाळंतपणासाठी आली होती. 24 ऑगस्टला ती प्रसूत झाली. तिने मुलीला जन्म दिला होता. ही मुलगी 4 सप्टेंबरच्या दुपारी बेपत्ता झाली होती. पोलिसांचा तपास चालू असतानाच इथापेच्या घरापासून अंदाजे 600 फूट अंतरावरील विहिरीत बालिकेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला होता.