आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्काबाद रस्त्यावरील निकृष्ट पुलाचे काम थांबवण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे तुर्काबाद खराडी रस्त्यावर पूल उभारण्यात येत असून, या पुलाचे बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप परिसरातील शेतक-यांनी केला आहे. हे काम त्वरित थांबवण्यात येऊन याची चौकशी करावी; अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतक-यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे वाळूज ते तुर्काबाद खराडी रस्त्यावरील पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. ठेकेदाराने मातीमिश्रित वाळू, हलक्या प्रतीची खडी व डब्बरचा वापर केला आहे. पुलावर टाकण्यात आलेला स्लॅब केवळ दोन ते अडीच इंच जाडीचा आहे. त्यात नावालाच सिमेंट वापरण्यात आल्याने आताच तडे गेले आहेत. त्यावरून एक ट्रॅक्टर गेल्याने प्लास्टर पडत आहे. त्यामुळे पुलावर शासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाणार असल्याने हे बांधकाम थांबवण्यात येऊन पुलाची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी, पुलाची पाहणी करताना लगतच्या शेतक-यांना बोलावण्यात यावे; अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा वैजापूरच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालय तसेच औरंगाबाद बांधकाम विभाग कार्यालयातीलअधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर अशोक जाधव, शिवसिंग राजपूत, पद्माकर जाधव, हुकूमसिंग राजपूत, योगेश जाधव आदी शेतकºयांच्या स्वाक्ष-या आहेत.