आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सावलीही साथ सोडून जाते... जाणून घ्या तुमच्या शहरात केव्हा येणार हा दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद  - आपली सावली कधीच साथ सोडत नाही, असे  म्हटले जाते. मात्र, वर्षातील एक दिवस आपली सावलीही साथ सोडून जाते. अर्थात, ती दिसत नाही. या मे महिन्यात शून्य सावली दिवस म्हणजेच झीरो शॅडो डे असून वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या दिवशी आपलीच सावली साथ सोडणार आहे. औरंगाबाद आणि नाशकात २० मे रोजी निसर्गाचा हा रोमांचकारी अनुभव घेता येईल. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात, तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो.
पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. जणूकाही सावली गायब होते असा आभास निर्माण होतो. वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या दिवशी ही अवस्था निर्माण होते, अशी माहिती महात्मा गांधी मिशनच्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.  
 
या तारखा लक्षात ठेवा : शून्य सावलीचा अनुभव पुढील तारखांना पुढील शहरात बघता येईल. ११ मे - वाई, महाबळेश्वर, १२ मे - बार्शी, बारामती, १३ मे - लातूर.  १४ मे - अलिबाग, दौंड, पुणे, १५ मे – मुंबई, १६ मे - नगर, कल्याण, नांदेड, ठाणे, १८ मे – पैठण, १९ मे – जालना, २० मे - औरंगाबाद, नाशिक, २१ मे – मनमाड, २२ मे – यवतमाळ, २३ मे - बुलडाणा, मालेगाव, २४ मे – अकोला, २५ मे – अमरावती, २६ मे - भुसावळ, जळगाव, नागपूर.  
 
घरच्या घरीच करा निरीक्षण  
शून्य सावलीचा रोमांच अनुभवण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. गच्चीवर, मोकळ्या मैदानातही हा प्रयोग करता येईल. साधारणपणे सकाळी साडेदहा वाजेपासून निरीक्षण करता येईल. कमी होत होत सावली एकदम गायब होईल. परत ती मोठी होत सामान्य होईल. यात दुपारचे दोन  वाजतील.   
 
पुढील स्लाइडवर वाचा, रोमांचकारी घटना, ...आणि पाहा फोटो 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...