आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘इग्नू’चे प्रशिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - झपाट्याने होत असलेल्या इंटरनेटच्या प्रसाराबरोबरच सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी इग्नूने सायबर लॉ प्रोग्राम हा सहा महिन्यांचा आधुनिक पाठय़क्रम विकसित केला आहे. त्यामुळे विद्यार्थी सायबर क्राइमविरोधात लढण्याचे धडे घेतील.
वेबसाइट हॅक होणे, मेल आयडी अथवा त्याचा पासवर्ड हॅक करून गैरव्यवहार करणे असे प्रकार वाढले आहेत. यांना आळा कसा घालावा याची माहिती होण्यासाठी हा सायबर लॉ प्रोग्राम अभ्यासक्रम प्रथमच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात सुरू करण्यात येत असल्याची माहिती औरंगाबाद इग्नू सेंटरचे प्रमुख डॉ.एम.एस.वानखेडे यांनी दिली.
हा अभ्यासक्रम केवळ विधी क्षेत्रातपुरता र्मयादित नाही, तर याची माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे. त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. शहरात राहूनही हा ऑनलाइन व ऑफलाइन कोर्स विद्यार्थी करू शकतात. तसेच याचा फायदा पोलिस खात्यात काम करणार्‍यांनाही मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
अभ्यासक्रम : या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. या संकेतस्थळावर ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो. प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट आहे. सायबर लॉच्या माध्यमातून गुन्ह्यांचा तपास कसा करावा, वेबसाइट हॅक होऊ नये यासाठीच्या उपाययोजना, ई-कॉर्मसद्वारे होणारे गुन्हे कसे टाळता येतील, मोबाइल इन्व्हेस्टिगेशन, ई-कोडिंग मॅनेजमेंट आदी माहिती यात दिली जाईल.
अभ्यासक्रम फायदेशीरच - ऑनलाइन जॉब, लॉटरी यात बरेच जण फसतात. गुन्हेगारीचा भाग हा सायबर क्राइम आहे. सायबर क्राइम हा केवळ आयटीपुरता र्मयादित नाही. त्यासाठी एक्स्पर्टची गरज आहे. जग ग्लोबल इंटिग्रेटेड होत चालले आहे. त्यामुळे ह्या अभ्यासक्रमाची गरज शासकीय, कॉर्पोरेट, पोलिस क्षेत्रासह सर्वांनाच आहे. अँड. यशोदीप देशमुख
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे असे अभ्यासक्रम असायला हवेत. ह्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी भारतीय दंड संहिता, त्याचा तपास कसा होतो याची माहिती मिळेल. यातील करिअरच्या संधी केवळ आयटी क्षेत्रासाठी र्मयादित नाहीत तर पोलिस आणि शासकीय, खासगी क्षेत्रातही याची गरज आहे. अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक