आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्रजी विभागप्रमुखाच्या चौकशीसाठी विद्यापीठाने नेमली त्रिसदस्यीय समिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील पीएचडीच्या संशोधक विद्यार्थिनीस त्रास आणि येमेनच्या विद्यार्थ्याचा अपमान करून ग्रेड बदलल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ.गीता पाटील यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे, अशी माहिती विशेष अधिकारी डॉ.वाल्मीक सरवदे यांनी दिली. 


इंग्रजी विभागात प्री-पीएचडी कोर्सच्या प्रमाणपत्र वितरणावेळी येमेनच्या विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर खाडाखोड करून ऐवजी बी ग्रेड केल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा पीएचडीच्या विद्यार्थिनीला त्रास दिल्याबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. येमेनच्या विद्यार्थ्याने येमेन दूतावासाकडे तक्रार केली. मात्र विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. या संदर्भात दिव्य मराठीने केलेल्या पाठपुराव्याची दखल विद्यार्थी संघटनांनी घेतली. बुधवारी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंची भेटही घेतली. डॉ.पाटील यांची गाइडशिप अाधीच रद्द केली आहे. या प्रकरणांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीच्या अहवालानंतर कुलगुरूच निर्णय घेतील, असेही डॉ.सरवदे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...