आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजाची संवेदनहीनता की पोलिसांची निष्क्रियता ? मृत्यूनंतरही त्याला नियतीने छळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नव्या पोलिस आयुक्तांचा पदग्रहण सोहळा आणि मावळत्या आयुक्तांच्या निरोप समारंभाला सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित राहिले. मात्र, याचदरम्यान मुकुंदवाडीतील संजयनगर येथील आत्महत्या केलेल्या नागरिकाचा मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना तब्बल चार तास लागले. सायंकाळी पाच ते नऊपर्यंत या वृद्धाचा मृतदेह घरातच पडून राहिला. केवळ एकच कॉन्स्टेबल तेथे पोहोचला होता.

संजयनगर येथील तुळशीराम रंभाजी इंगळे (७०) हे गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होते. मोलमजुरी करून पत्नी सुमनबाई कसाबसा संसाराचा गाडा ओढीत होती. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ती शासकीय कर्करोग रुग्णालयात औषधी आणण्यासाठी गेली असता तुळशीराम यांनी छताला लुंगीचा फास लावून आत्महत्या केली. पाचच्या सुमारास त्यांची पत्नी घरी परतली असता घडला प्रकार उघड झाला. नागरिकांनी तत्काळ मुकुंदवाडी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर कॉन्स्टेबल योगेश पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला. पाटील यांनी पंचनामा करून पोलिस ठाण्याशी रुग्णवाहिका पाठवण्यासाठी अनेकदा संपर्क साधला. मात्र, चार तासांपर्यंत कोणीही तेथे पोहोचले नाही. ही बाब नागरिकांनी "दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून दिली. "दिव्य मराठी'चा प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचल्यानंतर मात्र पोलिस प्रशासन हलले. पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि हवलदारांचा फौजफाटा घटनास्थळी आला.

मुकुंदवाडी भागातील संजयनगरात गल्ली नंबर १९ येथे तुळशीराम इंगळे यांनी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आत्महत्या केली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत हा मृतदेह याच ठिकाणी पडून होता.
पुढे पाहा घटनाक्रम