आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inspirants Of Corporators CET Examination Result 79.04 Percent

औरंगाबाद पालिका निवडणूक: इच्छुक नगरसेवकांची 'पहिली' परीक्षा, निकाल ७९.०४ टक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद मनपा निवडणूक लढू इच्छिणा-या संभाव्य उमेदवारांसाठी ‘दिव्य मराठी’ तर्फे शनिवारी घेण्यात आलेल्या एएमसी-सीईटी अर्थात उमेदवार पात्रता चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पहिल्या आलेल्या तीन पुरुष आणि स्त्री परीक्षार्थींचा रविवारी गौरव करण्यात येणार आहे.
औरंगाबाद - शहरातील शिवछत्रपती महाविद्यालयात "दिव्य मराठी' तर्फे घेण्यात आलेल्या औरंगाबाद महापालिकेसाठीच्या पात्रता चाचणीत (AMC-CET) ७९.०४ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम येणा-या उमेदवाराने तब्बल ९६ टक्के म्हणजे ४८ गुण मिळवले आहेत. महिलांमध्ये प्रथम येणा-या उमेदवाराला ३९ गुण मिळाले आहेत. गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे.
सेवा क्षेत्रासह डॉक्टर, इंजिनिअर यांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून करिअर करण्याची अट आहे. लोकप्रतिनिधींना मात्र अशा कुठल्याही चाचणीची प्रतिपूर्ती न करता सभागृहात प्रवेश मिळतो. एनकेन प्रकारे जनमत मिळवणे, एवढ्या एकाच निकषावर त्यांची पात्रता ठरते. या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्यांना किमान कामकाजाविषयी माहिती असावी म्हणून मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ तर्फे एन-३ येथील छत्रपती महाविद्यालयात शनिवारी सीईटी घेण्यात आली. या पात्रता परीक्षेत राजकीय पक्षांच्या ८० टक्के संभाव्य उमेदवारांनी तथा अपक्षांनी अपेक्षित यश मिळवले ही शहराच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. निवडणुकीत काट्याची टक्कर देणा-या पुरुष गटांत गुण मिळवण्यासाठीही चांगलीच रस्सीखेच दिसून आली आहे.
प्रथम येणा-याला ४८ गुण
प्रथम क्रमांक पटकावणा-या परीक्षार्थीने ५० पैकी ४८ गुण संपादित केले आहेत. द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या परीक्षार्थीने ४६ तर तृतीय क्रमांक पटकावणा-या परीक्षार्थीने ४४ गुण प्राप्त केले. महिलांत प्रथम आलेल्या परीक्षार्थीने ३९, द्वितीय आलेल्या दोन्ही महिलांनी ३८, तर तिस-या क्रमांकाच्या महिलेला ३७ गुण मिळाले आहेत. महिलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४८.६४ टक्के तर पुरुषांचे प्रमाण ८६. ९२ टक्के आहे.