आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत मुलीची प्रेरणा बनली 66 वर्षीय 'विद्यार्थी' आई !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सरकारी नोकरीतून निवृत्ती झालेल्या 50 वर्षीय मुलीला महाविद्यालयात जायची, परीक्षा द्यायची लाज वाटते म्हणून तिच्या 65 वर्षे वयाच्या आईनेच वर्षभरापूर्वी पुढाकार घेऊन 12वीला प्रवेश घेतला आणि आज दोघीही औरंगाबाद शहरात एकाच परीक्षा केंद्रावर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा बरोबरच देत आहेत.
शांतीपुरा छावणी येथील रहिवासी सुशीला आर. निर्मल यांनी शनिवारी दुपारी कला शाखेच्या पहिल्या वर्षाचा ‘पेपर’ दिला. शहरातील सरस्वती भुवन कला महाविद्यालयात सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत त्यांचा पेपर असतो तर त्यांची मुलगी उज्‍जवला निर्मल-दत्त या दुसर्‍या वर्षाचा पेपर दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत त्याच महाविद्यालयात देत आहेत. आई परीक्षा हॉलमध्ये जाते तेव्हा मुलगी बाहेर अभ्यास करत बसते तर मुलगी परीक्षागृहात गेल्यावर आई तिची प्रतीक्षा करते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून या मायलेकी कला शाखेची पदवी मिळवित आहेत.
बारावीनंतर एकच वर्ष शिक्षण घेऊ शकलेल्या आपल्या मुलीने आता स्वेच्छा निवृत्तीनंतर तरी पदवी घ्यावी आणि कायद्याचा अभ्यास करावा, असा आग्रह सुशीला निर्मल यांनी उज्‍जवला दत्त यांच्याकडे धरला होता; पण या वयात अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि त्यासाठी महाविद्यालयात जायचं ही कल्पनाच उज्‍जवला यांना पटत नव्हती. त्यांचा संकोच आईच्या आग्रहाला यश येऊ देत नव्हता. त्यामुळे या संकोचाला आपणच उत्तर द्यायचं असा निर्णय सुशिला यांनी घेतला आणि 12 वीच्या परीक्षेचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आश्चर्य म्हणजे वयाच्या 65 व्या वर्षी त्या 12वीची परीक्षा प्रथम र्शेणीत उत्तीर्ण झाल्या. लगेचच त्यांनी बीएच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. त्यामुळे मुलीलाही पुन्हा पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. आज या मायलेकी खर्‍या अर्थाने तरूणांसाठीही प्रेरणास्थान बनल्या आहेत.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...