आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inspiration Of Divya Marathi Industry Excellence Award

‘दिव्य मराठी’च्या अवॉर्डमुळे प्रेरणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दैनिक ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्डमुळे आणखी उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे मत गेल्या वर्षी पुरस्कार मिळालेल्या उद्योजकांनी व्यक्त केले. पुरस्काराचा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आणि नव्या उमेदीने उद्योग करणार्‍या उद्योजकांना प्रोत्साहन देणारा आहे. मागील वर्षी आठ उद्योजकांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
कार्याची दखल घेतली -
दिव्य मराठी’ने 2012-13 मध्ये एमएसएमई ऑफ द इअर अवॉर्ड एएसआर इंडस्ट्रीच्या श्रीधर नवघरे यांना दिला. याबाबत नवघरे म्हणतात, अवॉर्डमुळे आमच्या कार्याची ओळख झाली. आमचा उद्योग काय आहे हे लोकांना माहीत झाले. या माध्यमातून लोकांमध्ये उद्योगाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. माध्यमांद्वारे हा उपक्रम उद्योजकांना प्रेरणा देणारा आहे. या पुरस्कारामुळे नव्या उद्योजकांनाही चांगले काम केले तर दखल घेतली जाते, हा विश्वास निर्माण होईल. आपल्या कामाची सरकारने नाही मात्र माध्यमांनी दखल घेतल्याचे समाधान मिळाले.
प्रेरणादायी पुरस्कार :
अवॉर्ड फॉर इनोव्हेशन हा 2012-13 चा पुरस्कार आर. जे. इंजिनिअरिंगच्या जय राव यांना मिळाला. ते म्हणतात, हा पुरस्कार प्रेरणादायी ठरला. बर्‍याचदा सामाजिक, राजकीय, साहित्य क्षेत्रात पुरस्कार दिले जातात. मात्र, उद्योजकांना पुरस्काराने सन्मानित करणे अतिशय गौरवाची गोष्ट आहे. चांगल्या कार्याची दखल घेतली जाते, हा संदेश या माध्यमातून मिळाला. ऑटोबायोटिकच्या भाषेत सांगायचे, तर पुरस्काराच्या माध्यमातून 500 एमजीचे बूस्ट मिळाल्याची भावना जय राव यांनी व्यक्त केली.