आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेणीत या सुविधा कधी मिळणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निधी कधी येणार हे गुलदस्त्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील कैलास लेणी पाहण्यासाठी दररोज जगभरातून लाखो पर्यटक येथे भेटी देतात. पर्यटक संख्येत वाढ व्हावी यासाठी पर्यटन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या वतीने सतत प्रयत्न सुरू असतात. असे असूनही येथे येणारा पर्यटक अपुऱ्या सोयी-सुविधा पाहून पुन्हा फिरकेल की नाही याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे येथे स्थानिकांमधून पर्यटनस्थळी अपुऱ्या सेवा-सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी आता पुढे येत आहे. 

याच धर्तीवर मंगळवारी राज्यातील गडकिल्ले व इतर जागतिक वारशाची ठिकाणे संवर्धनासाठी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिकमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली  दिल्लीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत रायगड किल्ल्याच्या संवर्धनसाठी शासनाने आखलेल्या ६०० कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्राने तत्त्वत: मान्यता दिली. याच वेळी राज्यातील ऐतिहासिक वारसा अजिंठा - वेरूळ लेणींच्या ठिकाणी आवश्यक सुविधांसाठीही केंद्राकडून निधी पुरवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी हा निधी किती, कसा  आणि केव्हा येणार याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.  

लेणी परिसरातील सुविधा माहितीअभावी पर्यटकांपर्यंत पोहोचेना  
लेणीच्या समोर एमटीडीसीने वेरूळ पर्यटक केंद्र उभारावे. यामध्ये कैलास लेणीची प्रतिकृती, लेणी माहितीपट, हेलिपॅडसह यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. परंतु या पर्यटन केंद्राविषयी आजही येथे येणाऱ्या सत्तर टक्के पर्यटकांना याविषयी माहिती नाही. ती पर्यटकांना व्हावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.  तसेच येथे वन विभागामार्फत १२ एकरावर वनोद्यान उभारण्यात येत असून आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नातून महेशमाळ, शूलिभंजन प्राधिकरणास ४५० कोटींची तत्त्वत: मान्यता मिळालेली आहे.  

पुढील स्‍लाइ्डरवर वाचा, लेणीत कचरा व्यवस्थापन गरजेचे 
 
बातम्या आणखी आहेत...