आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयबी, एटीएसचे पथक शहरात ठाण मांडून, संशयित व्यक्ती आणि वसाहती रडारवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संशयित शाहिद याची जप्त केलेली दुचाकी.)
औरंगाबाद- गेल्या महिनाभरापासून एटीएस आणि आयबीचे विशेष पथक शहरात ठाण मांडून आहे. या पथकात नाशिक, पुणे आणि नागपूर एटीएसचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून परभणीतून अटक करण्यात आलेल्या नासेर चाऊस आणि शाहिद खान यांच्या चौकशीनंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, शाहिद खान याची दुचाकी औरंगाबादेतून एटीएसने जप्त केली. या दुचाकीचा क्रमांक औरंगाबाद आरटीओचा चेसिस क्रमांक जालना पासिंगचा असल्याचे समोर आले असून ही गाडी चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आहे. शाहिद खान औरंगाबादेत शिक्षण घेत होता. रमजान महिन्यात दुचाकी मित्राच्या घरी ठेवून तो परभणीला गेला होता. कामानिमित्त परभणीला जात आहे, आल्यावर मोटारसायकल घेऊन जातो, असे त्याने सांगितले होते. एटीएसने शाहिदला पकडल्यानंतर औरंगाबादेतील मित्र घाबरला. त्याने काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली शाहिदने माझ्या घरी दुचाकी ठेवल्याचे सांगितले होते. एका कॉल सेंटरमध्ये काम करताना त्याची आणि माझी ओळख झाल्याची कबुलीही त्याने दिली.

कुठेफोडायचा होता बॉम्ब? मुंबईत१९९३ मध्ये बॉम्बस्फोटांसाठी दुचाकींचा वापर करण्यात आला होता. पुण्यातही अशाच प्रकारे दुचाकीचा उपयोग झाला होता. गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या दुचाकी चोरीच्या असतात. ही दुचाकीदेखील चोरीची आहे का, याचा तपास सुरू आहे. श्वानपथकाकडून या दुचाकीची पाहणी केली असता काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. या दुचाकीचा उपयोग करून शाहिदला शहरात कुठे स्फोट करायचा होता का, या दिशेने तपास सुरू आहे. शाहिद पूर्वी परभणी येथे कॉल सेंटरमध्ये कामाला होता. कंपनीच्या सेमिनार, बैठकांसाठी तो औरंगाबादेत यायचा. येथे आल्यावर कंपनीतील रेकॉर्डिंग मॅनेजर असलेल्या तरुणाशी त्याची ओळख मैत्री झाली. तो एका इमाम होस्टेलमध्ये राहत होता. औरंगाबादेत येण्यापूर्वीच त्याने ती नोकरी सोडली होती.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तपासाला वेग : वेरूळशस्त्रसाठा प्रकरणातील प्रमुख आरोपी अबू जिंदालला दोषी ठरवण्यात आले असून त्याला न्यायालय केव्हाही शिक्षा ठोठावू शकते. जिंदाल हा मराठवाड्यातीलच असून त्याचे पडसाद या भागात उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासाला वेग आला असून संशयितांची चौकशी सुरू आहे.

नंबर प्लेटवरील अक्षर गायब
जप्त दुचाकीचा क्रमांक एमएच २० डी ८०१८ असा आहे. यातील डी पूर्वीचे एक अक्षर गायब आहे. ती शाहिदकडे कशी आली, याचा शोध पथक घेत आहे, तर शाहिदच्या मित्राकडून आणखी काही माहिती मिळवली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...