आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intelligence Departments Report In Favor Of Shiv Sena BJP

गुप्तचर विभागाचा अहवाल युतीच्या बाजूने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपात पुन्हा युतीची सत्ता येईल, असे पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. पोलिसांनी वरिष्ठांना पाठवलेल्या अहवालात शिवसेना व भारतीय जनता पक्षाला मिळून ५५ पेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असे म्हटले आहे. एमआयएम हा नवा पक्ष २० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असे भाकीत यात वर्तवण्यात आले आहे.

प्रत्येक निवडणुकीपूर्वी पोलिस यंत्रणा एक प्राथमिक अंदाज व्यक्त करते. त्यासाठी त्यांच्यातील सर्व स्रोतांचा वापर केला जातो. पोलिस यंत्रणने दिलेल्या अहवालाचे अंदाज ९० टक्क्यांपर्यंत खरे ठरत असल्याने राजकीय पक्षांचेही या अहवालाकडे लक्ष लागलेले असते. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस दलाने दिलेले अहवाल अन् प्रत्यक्ष निकाल यात फारसा फरक नव्हता. त्यामुळे मनपा निवडणुकीसाठी पोलिसांचा अहवाल काय म्हणतो, याकडे जाणकारांचे लक्ष लागले होते. पोलिसांचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे रवाना झाला असून त्यात युती होण्याबरोबरच या दोन्ही पक्षांच्या मिळून एकूण जागा ५५ पेक्षा जास्त असू शकतील, असे त्यात म्हटले आहे. एमआयएम हा पक्ष २० पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो, असेही भाकीत पोलिसांच्या अहवालात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष यांची संख्या प्रत्येकी १० च्या आसपास राहील, असेही यात म्हटले आहे.

युती गृहीत धरली
युतीला ५५ जागा मिळणार असे नमूद करण्यात आले असले तरी त्यात शिवसेना व भाजपला किती, असा उल्लेख नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. गतवेळप्रमाणे युती होणारच, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला नाही, असे या विभागात काम करणाऱ्या सूत्रांनी म्हटले आहे.