आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inter cast Marriage Coupal Issue At Aurangabad, Divya Marathi

आंतरजातीय विवाह करणार्‍यांचा लढा, उपस्थितांच्या डोळ्यांत तरळले पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कंपनीमध्ये काम करता-करता एकमेकांवर जीव जडला. कठीण परिस्थितीत घरच्यांचा विरोध पत्करून विवाह केला. मात्र, त्यामुळे घरच्यांनी संबंधच तोडले. अशा एकाकी पडलेल्या जोडप्यांच्या अनुभवकथनाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तरळले. बाबा दळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंतरजातीय विवाहित जोडप्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

बाबा दळवी विचार मंच, महाराष्ट्र राज्य जनजागर ओबीसी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे, माजी कुलगुरू डॉ. पी. जी. धुळे, आकाशवाणीचे सिद्धार्थ मेर्शाम, के. ई. हरदास, कचरू वेळंजकर, ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, डॉ. जयदेव डोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मालती सुरासे, संजीवनी घोडके, सुनीता शिरोमणी, विलास आहेरकर, नितीन शिरवाडकर यांनी पर्शिम घेतले.