आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालक दिन नव्हे, बाल सप्ताह साजरा व्हावा; सीएफएसआयचे अध्यक्ष मुकेश खन्ना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- फक्त एका दिवसापुरता बालकदिन साजरा करण्याची परंपरा आता मोडीत निघायला हवी. बालकांना आनंद साजरा करण्याचे अनेक क्षण मिळायला हवेत. याच उद्देशाने यंदापासून बालचित्रपट सप्ताह आयोजित करण्याचा निर्धार अाहे, असे मत राष्ट्रीय बालचित्रपट समितीचे अध्यक्ष (सीएफएसआय) आणि ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी व्यक्त केले आहे. आगामी जुलै महिन्यात देशभरात प्रथमच हा सप्ताह आयोजित केला जाणार आहे. याच निमित्ताने मुकेश खन्ना यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला.
    
बालचित्रपट महोत्सवाची नवी संकल्पना सादर करणार आहात?   
मुकेश खन्ना :
आपल्याकडे माजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्ताने १४ नोव्हेंबरला बालक दिन साजरा केला जातो. हारतुरे अन् भाषणांच्या कार्यक्रमातच बालकांचा आनंद हिरावून घेतला जातो. बालकांना आनंद साजरा करण्याचे अनेक क्षण मिळायला हवेत. यासाठीच आम्ही भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या धर्तीवर यंदापासून बालचित्रपट सप्ताह आयोजित करण्याचे ठरवले आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विविध शहरांमध्ये हा सप्ताह एकाच वेळी आयोजित केला जाईल. 
   
विविध राज्यांकडून कमी प्रतिसाद दिसतोय?   
मुकेश खन्ना :
सध्या १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अायोजनाबाबत उत्सुकता दर्शवली आहे. यात उत्तर प्रदेश, दिल्ली, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, गोवा, गुजरात या राज्यांचा समावेश आहे. गुजरातच्या पर्यटन विभागाने तर आयोजनासाठी भन्नाट कल्पना मांडल्या. अन्य राज्यांकडून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही; पण आमचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही.

यापूर्वीच्या महोत्सवांना तितकी लोकप्रियता लाभली नाही?
मुकेश खन्ना :
बाल कथानकांकडे माझ्यासारख्या काही निवडक कलाकारांनीच लक्ष दिले. लोकसहभाग कमी पडल्याने लोकप्रियता मिळाली नाही. मात्र, आता बाल साहित्य, कथानकांवर आधारित चित्रपटांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे महोत्सवाची लोकप्रियताही वाढेल. 
 
बातम्या आणखी आहेत...