आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय पक्षी दिनानिमित्त हिमायतबागेत उद्या पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हिमायतबागेत किती प्रकारचे पक्षी आहेत? पाहुणे पक्षी किती? त्यांना कसे ओळखायचे? त्यांची नावे कशी पडली? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे गुरुवार, १३ एप्रिल रोजी हिमायत बागेत मिळणार आहेत. एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँ एज्युकेशनल अॅकॅडमीच्या वतीने आंतरराष्ट्रीय पक्षी दिनानिमित्त गुरुवार, १३ एप्रिल रोजी पहाटे ६.३० ते ९.३० दरम्यान पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विनामूल्य असणाऱ्या कार्यक्रमात सर्व वयोगटांतील पक्षीप्रेमींना उपस्थित राहता येईल.
 
पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणून पक्षी ओळखले जातात. अन्नसाखळीचे रक्षण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, हवामानातील बदल, वाढते शहरीकरण, वृक्षतोड, जंगलतोड यामुळे शहरी भागातून पक्षी नाहीसे झाले आहेत. सुदैवाने शहरातील काही भागांत अजूनही पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. हिमायत बाग त्यापैकीच एक. घनदाट वनसंपदा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पक्षी राहतात. आतापर्यंतच्या अभ्यासानुसार या ठिकाणी १२० हून अधिक प्रजातीचे पक्षी आढळतात. यात सुभग, टिकल्स ब्लू फ्लायकॅचर, मिनीवेट, धनेश, ग्रेट टीट, शिक्रा, पिंगळा आणि मोेर यांचा समावेश ओह. शहराच्या मध्यभागी असतांनाही या निसर्गसंपदेची फार नागरिकांना माहिती नाही. ही बाब हेरून एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँ एज्युकेशनल अॅकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय पक्षी दिनानिमित्त हिमायत बागेत पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डाॅ. दिलीप यार्दी यांनी दिली.
 
१३ एप्रिल रोजी पहाटे ६.३० ते ९.३० दरम्यान पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम होईल. या वेळी हिमायत बागेतील पक्ष्यांसोबतच इथली समृद्ध अशी निसर्गसंपदा बघण्याची संधी नागरिकांना मिळेल. या वेळी डॉ. यार्दी आणि अन्य तज्ज्ञ पक्ष्यांविषयी माहिती देतील. कार्यक्रमाला सर्व वयोगटांतील नागरिकांना सहभागी होता येईल. इच्छुकांनी पायात बूट, पाण्याची बाटली, टोपी, नॅपकीन आणि शक्य असल्यास दुर्बीण सोबत आणावी. सहभागी होण्याचे आवाहन डॉ. यार्दी यांच्यासह ओंकार सराफ, प्रसाद गुरू, श्रवण परळीकर आणि अमेय देशपांडे यांनी केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...