आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Film Festival Starting Today, Nana Patekar Presence Of Major

आजपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-शहरात होणार्‍या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. प्रोझोन मॉलमध्ये दुपारी 4.30 वाजता प्रख्यात सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. या वेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रोझोनचे अध्यक्ष अनिल इरावणे यांनी दिली. पहिल्या दिवशी झेक रिपब्लिकचा ‘टू द वुड्स’ हा चित्रपट दाखवण्यात येईल. वैविध्यपूर्ण, दज्रेदार आणि अभिरुचीसंपन्न चित्रपटांची पर्वणी सिनेरसिकांना मिळणार आहे. मराठीतील 8 चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. नाथ ग्रुप आणि प्रोझोनच्या पुढाकाराने घेण्यात येणार्‍या या महोत्सवाच्या इतर दिवशीही सिनेअभ्यासक आणि कलावंत हजेरी लावणार आहेत.
‘संत तुकाराम’ने सुरुवात
1936 मध्ये प्रभात थिएटर्सची निर्मिती असलेल्या ‘संत तुकाराम’ या चित्रपटाने सिनेजगतात कीर्तिमान स्थापित केले होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात या चित्रपटाने करण्यात येईल. सकाळी 11. 30 वाजता चित्रपट सत्यम थिएटरमध्ये सुरू होईल.