आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Forest Day,Latest News In Divya Marathi

जागतिक वन दिनानिमित्त 18 सापांना जीवदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहर आणि गावांतील नागरी वस्तीतून पकडलेल्या 18 सापांना जीवदान देण्यासाठी सर्पमित्र संघानंद शिंदे यांनी गौताळा अभयारण्यात सोडले आहे. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून (21 मार्च) शुक्रवारी हे साप सोडण्यात आले असून त्यामध्ये 10 नागांचा समावेश होता. चिकलठाणा, सिडको एन-1, म्हाडा कॉलनी, हर्सूल, एमआयडीसी, झाल्टा आदी ठिकाणांहून संघानंद शिंदे यांनी 18 सापांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये दहा इंडियन कोब्रा, कॉमन कोब्रा, दोन धामण, दोन धूळनागीण, एक मांडूळ आदींचा समावेश होता. सर्व सापांना एकत्रितपणे जागतिक वन दिनानिमित्त गौताळा अभयारण्यात सोडण्यात आले. वन परिमंडळ अधिकारी एस. डी. जाधव, वनरक्षक पी. डी. सूर्यवंशी, मच्छिंद्र शिंदे, भास्कर खंडाळे आदींची या वेळी उपस्थिती होती.