आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात साकारणार कोटींचे इंटरनॅशनल मेमोरियल; पर्यटक, संशोधकांसाठी आकर्षण ठरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यामागे कोटींचे डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मेमोरियल सेंटर अन् दीड कोटीचे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. येथे जागतिक स्तरावरील संशोधनासाठी विविध दालने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रस्तावित आराखडा तयार असून लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मंगळवारी (२३ मे) पत्रकारांना दिली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त अनेक उपक्रम यशस्वीपणे करण्यात आले. इंटरनॅशनल मेमोरियल सेंटर देखील त्याचाच एक भाग असून येथे सुसज्ज ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठ फंडातून कोटींची तरतूद केली असून शासनाने कोटीचे अनुदान दिले आहे. चार कोटींमध्ये येथे सांचीच्या स्तुपाप्रमाणे प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. दोन टप्प्यातील या प्रकल्पासाठी एकूण कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शासनाकडे विनंती करून आणखी आर्थिक मदत घेण्यात येणार आहे. 

देशपातळीवरील एकमेव रिसर्च सेंटर उभारण्यात येणार असल्याचा दावा कुलगुरूंनी या वेळी केला. आपण स्वत: सांची येथील स्तूप, नागपूरला दीक्षाभूमी, गुलबर्गा येथील मल्लिकार्जुन खरगे यांनी उभारलेल्या स्तुपाची पाहणी केली आहे. या वास्तूंपेक्षाही आकर्षक स्तूप येथे उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियोजित वास्तूचे डिझाइन वास्तुविशारद अजय कुलकर्णी यांनी केले आहे. त्यांनीच कुलगुरूंच्या वतीने पीपीटीद्वारे सादरीकरण केले. दीड कोटीचे ग्रंथालय उभारण्यात येणार असून परिसर सुशोभित होणार आहे. 

स्तुपाला चार दरवाजे, तोरण, घुमट, अशोक स्तंभाचे पिलर राहणार आहेत. येथील संस्कृती, ऐतिहासिक लेणींचा अभ्यास करून हा आराखडा केला आहे. अजिंठा-वेरूळ येथील कैलास लेणी तसेच अन्य ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देश-विदेशांतून लाखो पर्यटक-संशोधक औरंगाबादेत येतात. त्यांनी विद्यापीठाला भेट द्यावी, संशोधन करावे, अशा धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेमोरियल दोन वर्षांत तयार होईल, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...