आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगाराने तयार केले आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नेक कॅचर, यू ट्यूबर शोधली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पावसाळा आला की शहरात जागोजागी साप निघतात. मग साप पकडणाऱ्यांना बोलावले जाते. बऱ्याचदा ते वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांनाही अगदी सहजपणे साप पकडता येईल असे यंत्रच नितेश जाधव या सर्पमित्र कामगाराने तयार केले आहे, तेही जागतिक दर्जाचे. याच प्रकारच्या अमेरिकन यंत्राची किंमत 6 हजार रुपये आहे. नितेशने मात्र अवघ्या अडीच हजार रुपयांत यंत्र उपलब्ध करून दिले आहे. शेंद्रा एमआयडीसीत एका कंत्राटदाराकडे नितेश कामगार म्हणून काम करतो. 
 
साइटवर कामे करताना तेथे अनेक वेळा साप निघायचे. ते पकडून सर्पमित्रांना देणे किंवा तेथील जलाशयात सोडण्याचे काम तो करत होता. पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक यांनी त्याची ही कला पाहून त्याला सृष्टिसंवर्धन संस्थेचे सदस्य केले आणि सर्टिफाइड सर्पमित्राचे लायसन्सही वन विभागाच्या वतीने मिळवून दिले. आजवर नितेशने दोन हजार साप पकडले आहेत. यात कोब्रा ते अजगर अशा सर्व प्रकारच्या सरपटणाऱ्या जीवांचा समावेश आहे. पंधराशे साप पकडल्यावर त्याच्या असे लक्षात आले की, शहरात सर्पमित्र कमी आहेत. साप निघाल्यावर लोक घाबरतात. तेथे पोहोचेपर्यंत खूप वेळ लागतो. भारतात सध्या उपलब्ध असलेल्या स्नेक कॅचरने सापांचा मणका तुटतो, असे लक्षात आल्यावर त्याने यू ट्यूबवर स्नेक कॅचरची माहिती शोधली आणि स्वत: घरीच स्नेक कॅचर तयार केले. 

सापाला इजा होत नाही 
सापाला इजा होता त्याला पकडता यावे यासाठी त्याने नागाच्या फण्यासारखाच मेटलचा जबडा तयार केला. आतल्या बाजूने पॉलियुरॅथिन या पॉलिमरची गादी लावली आहे. त्यामुळे साप या काठीने पकडला तर त्याला कोणतीही इजा होत नाही. शिवाय नागरिकांना पाहिजे त्या लांबीचे स्नेक कॅचर तयार करून देण्याची नितेशची तयारी आहे. त्यानंतर प्रशिक्षण घेतलेले नागरिक सहजतेने सापाला पकडू शकतात. 

पुढील स्लाईडवर पाहा व्हिडीओ... 
बातम्या आणखी आहेत...