आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Wrestling Tournament, Latest News In Divya Marathi

विदेशी मल्लांनी गाजवले मैदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-वाडिया पार्क क्रीडा संकुलात आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेत विदेशी मल्लांनी मैदान गाजवले. रविवारी (3 मार्च) रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या कुस्ती स्पध्रेला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते स्पध्रेचे उद्घाटन झाले. लहान-मोठय़ा दीडशे कुस्त्या झाल्या. सुरुवातीला स्थानिक मल्लांच्या कुस्त्या घेण्यात आल्या. प्रथम क्रमांकाची कुस्ती तुर्कस्तानचा चॅम्पियन अब्दुल हमीद अल्तुन विरुद्ध राष्ट्रीय चॅम्पियन राहुल आवारे यांच्यात झाली. मातीवर झालेली ही कुस्ती बरोबरीत सुटली. दोन्ही मल्लांनी परस्परांवर मात करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, कुस्ती लांबत चालल्याने शेवटी बरोबरीत सोडवण्यात आली.
तत्पूर्वीच्या कुस्तीत तुर्कस्तानच्या तान्सू जेमेन्सी याने उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याला आस्मान दाखवले. मॅटवर झालेल्या या कुस्तीत आबदार चितपट झाला. इराणचा मल्ल अली इमाम मोगली याने मॅटवर झालेल्या कुस्तीत भारतीय मल्ल अमित गाडे याला आस्मान दाखवले.
मॅटवर झालेल्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन गुलाब आगरकर याने जॉजिर्याचा राष्ट्रीय विजेता नाजनी कॅचुसिलरवर विजय मिळवला. सोलापूरचा मल्ल किरण कदम याने दिल्लीच्या मोहम्मद शेखवर मात केली. योगेश पवार या मल्लाने दिल्लीचा राष्ट्रीय चॅम्पियन करमवीर सिंग याला धोबीपछाड दिला.
नगर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या कुस्तीप्रेमींनी यावेळी मैदान गजबजले होते. देशी-विदेशी मल्लांच्या कौशल्याचा थरार प्रेक्षकांनी श्वास रोखून यावेळी अनुभवला. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लढतींमध्ये रंगत वाढली होती. आमदार अरुण जगताप, शिवाजी कर्डिले, महापौर संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, विक्रमसिंह पाचपुते आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, पदाधिकारी धनंजय जाधव, छबुराव जाधव, नामदेव लंगोटे, नाना डोंगरे, सुनील भिंगारे, विलास चव्हाण यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. स्पध्रेचे समालोचन शंकर पुजारी यांनी केले.