आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएमआयसीत इंटर्नशिपची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील सोयी-सुविधा तसेच प्रकल्पाचा आराखडा ठरवण्यासाठी कामाला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष प्रकल्प राबवण्याआधी डीएमआयसीत संशोधन केले जाईल. विशेष म्हणजे यात सर्वच शाखेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी असून केंद्र शासनाकडून प्रत्येकी दहा हजारांपर्यंत मानधन मिळेल.

अनेक शहरात डीएमआयसी यशस्वी करण्यासाठी त्यावर संशोधनही करणे गरजेचे असल्याने ही योजना आखली आहे. सध्या या प्रकल्पात काम करणे म्हणजे कायमस्वरूपी नोकरी किंवा नोकरीची हमी नाही.
०विद्यार्थी भारताचा नागरिक हवा
० पदव्युत्तर शिक्षण घेत असावा
० योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा
० संशोधकाला दर महिन्याला 10 हजार रुपये मिळणार
० संशोधकाच्या राहण्याची तसेच ऑफिससाठी लहानशी जागा
० ज्या शहरात डीएमआयसी होणार आहे त्या शहराशी संबंधित
विभागाशी विद्यार्थ्यांना जोडण्यात येईल
० सहा महिन्यांत केलेल्या संशोधनाचे
पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्यावे लागेल. लघुप्रबंध सादर करावा लागेल

असा करा अर्ज
इंटर्नशिपसाठी दर महिन्याच्या एक तारखेला अर्ज पाठवण्याची सुविधा आहे. विद्यार्थ्यांनी माहिती अर्ज डीएमआयसी डीसी, रूम, नं. 341 बी, तिसरा मजला, हॉटेल अशोका, डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह, 50-बी, चाणक्यपुरी, नवी दिल्ली. 11021 किंवा (dmicdc.com) वर अर्ज करावेत. अर्जदारांना महाविद्यालयाच्या विभागप्रमुखांचे संमतीपत्र पाठवावे लागेल. वेबसाइटवर अर्जाचा नमुना असून तो तत्काळ पाठवला तर अर्जांची छाननी होऊन त्यानंतर कॉल पाठवण्यात येतील.