आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता देवगिरी किल्ला होणार बोलका! अाता देवगिरी किल्ला होणार बोलका!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याचा इतिहास जाणून घेणे पर्यटकांना आता अधिक सोपे होणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने येथे इंटरप्रिटिशन सेंटर उभारण्याचे काम हाती घेतले असून यात हिंदी, इंग्रजी आणि मराठीत किल्ल्याच्या कोपरा ना कोपऱ्याची माहिती उपलब्ध असेल. चित्रे, प्रकाशयोजना, माहितीफलक आदींच्या माध्यमातून हा किल्ला बोलका करण्याचा पुरातत्त्व खात्याचा हा उपक्रम दोन महिन्यांत पर्यटकांसाठी खुला होईल.
यादव राज्यकर्त्यांनी देवगिरी किल्ला उभारला. अभेद्य किल्ला म्हणून याची इतिहासात नोंद आहे. तीन भव्य तटबंद्या किल्ल्याचे रक्षण करतात. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणूनही या किल्ल्याचा उल्लेख होतो. यामुळेच जगभरातील हजारो पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात. किल्ला सर करण्यापूर्वी त्याची सखोल माहिती मिळावी, यातून किल्ल्याचे अंतरंग समजावे यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग किल्ल्याच्या पायथ्याशीच इंटरप्रिटिशन सेंटर उभारत आहे.

इंटरप्रिटिशन सेंटरचे ७० टक्के काम पूर्ण
पर्यटकांना किल्ला सर करण्यापूर्वीच त्याचा इतिहास समजल्यास ते अधिक प्रभावीपणे किल्ला बघू शकतील. यासाठी येथे इंटरप्रिटिशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव पुरातत्त्व खात्याने मुख्यालयाला पाठवला होता. त्यास वर्षभरापूर्वी मंजुरी मिळताच किल्ल्याची अचूक माहिती गोळा करण्यात आली. नंतर त्याचे हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर करण्यात आले. हिंदीतील मजकूर उपअधीक्षक पुरातत्त्वज्ञ शिवकांत बाजपेयी यांनी तयार केला. किल्ल्याची छायाचित्रे काढून त्याखाली मजकूर अशा स्वरूपात ही चित्रे मांडली जातील. सेंटरचे ७० टक्के काम पूर्ण झाले अाहे.

किल्ल्याचा आभास होईल
^किल्ल्यात नेमके काय बघायचे आहे, त्याचा इतिहास, महत्त्व समजावून सांगण्यासाठी इंटरप्रिटिशन सेंटर महत्त्वाचे ठरेल. येथे पर्यटकांना किल्ल्यांचा आभास निर्माण होईल. यातून त्यांना अधिक प्रगल्भ पर्यटनाचा आनंद घेता येईल. -शिवकांत बाजपेयी, उपअधीक्षक पुरातत्त्वज्ञ, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, अौरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...