आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसाला चित्रपटांकडून प्रेक्षक वास्तववादीकडे वळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सध्याचे युग हे वास्तववादी, बुद्धिजीवी चित्रपटांचे आहे. मसाला चित्रपटांपेक्षा बुद्धीला साद घालणार्‍या चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओढा वाढल्याने हे नवे युग अवतरले आहे. प्रेक्षक सध्या कल्पना, विनोदापेक्षा वास्तवाला जास्त पसंती देत असल्याने अशा पद्धतीच्या चित्रपटांची निर्मिती होऊ लागली आहे. वास्तववादी चित्रपटांची निर्मिती ही कलावंतांच्या दृष्टीनेही खूप चांगली गोष्ट असल्याचे मत अभिनेता राकेश वशिष्ट याने व्यक्त केले.

प्रोझोन मॉलमध्ये दांडिया उत्सवानिमित्त राकेश तरुणाईचा उत्साह वाढवण्यासाठी आला होता. ‘तुम बिन’सारख्या मल्टिस्टारर चित्रपटातून पदार्पण करणार्‍या या मराठी चेहर्‍याने सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, मोठे यश त्याच्या वाट्याला आले नाही. या वेळी राकेशने विविध विषयांवर केलेली चर्चा त्याच्याच शब्दांत..

‘वाँटेड’, ‘रेडी’ आणि ‘बॉडीगार्ड’सारख्या चित्रपटांना यश मिळाले असले तरी ‘लंच बॉक्स’सारख्या चित्रपटांनाही प्रेक्षक पसंती देतात. प्रेक्षक ज्याला पसंती देतात त्याची पुन्हा पुन्हा निर्मिती होणार. हा इंडस्ट्रीचा ट्रेंड आहे. हल्ली प्रेक्षकांचा कल नव्या वास्तववादी निर्मितीकडे आहे. त्यामुळे चित्रपटांची दिशा ही खर्‍या अर्थाने प्रेक्षकच ठरवतात. पण याची प्रेक्षकांना तितकीशी जाणीव नाही.