आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अव्वल विद्यापीठांशी करार- कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झालो ही गौरवास्पद गोष्ट आहे. आता बाबासाहेबांच्या नावाला साजेल असे काम उर्वरित चार वर्षांत करायचे आहे. रुजू झाल्यापासून वर्षभरात आपण विविध संस्थांकडे १६११ कोटींचे संशोधन प्रकल्प सादर केले असून जगातील अव्वल विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केले जात असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. जून २०१५ रोजी त्यांची एक वर्षाची कारकीर्द पूर्ण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यांच्याशी केलेली खास बातचीत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात.
वर्षपूर्तीनिमित्त विशेष मुलाखत

प्रश्न: कुलगुरू होऊ असे वाटले होते का?
कुलगुरू : विद्यार्थीदशेपासून मी गुणवंत विद्यार्थी होतो. शिक्षण, संशोधन सर्वच क्षेत्रात मी नाव कमावल्यामुळे विद्यार्थी दशेतच कुलगुरू होण्याचा संकल्प केला होता.

प्रश्न: या विद्यापीठात येण्याची इच्छा होती?
कुलगुरू
: तीनकेंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू होण्यासंदर्भात मला विचारणा केली होती. डाॅ. आंबेडकरांचे नाव असलेल्या विद्यापीठाचेच कुलगुरू होण्याचा माझा प्रयत्न होता, अन् मी साध्य केला.

प्रश्न: संकल्प काय, कसा साधणार विकास?
कुलगुरू :
गुणवत्तेचेशिक्षण आणि संशोधनासाठी या विद्यापीठाचे जगात नाव व्हावे यासाठी आपला प्रयत्न आहे.
प्रश्न-निधीची तरतूद कशी करणार आहात?
कुलगुरू-
यूजीसी, सॅप,रुसासह संशोधनात अग्रेसर असणाऱ्या विविध शिखर संस्थांकडे आपण १६११ कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी १० हजार ११३ प्रस्ताव संलग्नित महाविद्यालयांचे आहे. निधीचे प्रस्ताव देण्यासाठी दोन भाग असतात. एक तर विद्यापीठ परिसर आणि दुसरे म्हणजे संलग्नित महाविद्यालये. विद्यापीठ परिसरासाठी यूजीसीकडे १२५ कोटी रुपयांचे प्रस्ताव दिले आहेत, तर संलग्नित महाविद्यालयांसाठी ४८२ कोटींचे प्रस्ताव आहेत. रूसा म्हणजेच राष्ट्रीय उच्चशिक्षण अभियानाअंतर्गत १८४ कोटींचे विद्यापीठ परिसरासाठी तर महाविद्यालयांचे ८२० कोटींचे प्रस्ताव दिलेले आहेत. शिवाय स्पेशल असिस्टंट प्रोग्राम (सॅप) अंतर्गत नव्याने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे कोटी २० लाख रुपये मंजूर झालेले आहेत.
प्रश्न-नव्याने संरचना करून निधीचे प्रस्ताव दिले आहेत का?
कुलगुरू-
केंद्रीय विज्ञानतंत्रज्ञान विभागाकडे (फिस्ट) फॅसिलिटी फॉर इन्फर्मेशन अँड टेक्नॉलॉजीसाठी ११.२ कोटींचा प्रस्ताव दिला आहे. सीपीईपीए म्हणजेच सेंटर फॉर पोटेंशियल एक्सलन्स इन पर्टिक्युलर एरिया या केंद्रासाठी सहा प्रस्ताव दिले आहेत. प्रत्येक प्रस्ताव दहा कोटींचे असून एकूण ६० कोटींची निधीची आवश्यकता आहे.
प्रश्न-अध्यासनकेंद्राची अवस्था अत्यंत वाईट आहे?
कुलगुरू-
सध्या सुरू असलेल्या अध्यासन केंद्रांना सक्षम केले जाईल, शिवाय यूजीसीकडे आणखी २४ अध्यासन केंद्रांचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी ४.८ कोटी रुपये हवे आहेत.
प्रश्न-क्रीडासह अनेक विभागांना सक्षम करावे लागेल, त्यासाठी काय करणार?
कुलगुरू-
विद्यापीठाने मागीलवर्षी ऑलिंपिकच्या धर्तीवर क्रीडा महोत्सव घेतला. त्यामध्ये २० विद्यापीठ आणि ७०० महाविद्यालयांच्या ४००० खेळाडूंनी सहभाग घेतला. क्रीडा गीत तयार केले होते. दहा लेनचा ४०० मीटर रनिंग ट्रॅक तयार आहे. शिवाय स्पोर्ट कॉम्प्लेक्ससाठी २५ कोटींचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे क्रीडा विभागालाही सक्षम करण्यासाठी पावले उचलली आहेत.
प्रश्न-विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी काही पावले उचलली आहेत का?
कुलगुरू-
ग्रामीण भागातीलशेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांच्या संशोधनासाठी पैसे कमी पडू नये म्हणून ५० लाखांच्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. पैशांअभावी कुणाचेच संशोधन रखडणार नाही. एन्ड्रस प्लस हाऊजर जर्मन कंपनीकडून दरवर्षी २० विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून घेतली आहे.
प्रश्न-प्रशासनातपारदर्शकता आणण्यासाठी काय केले?
कुलगुरू-आरटीजीएस प्रणाली लागू केली असून सर्व विभागांचे व्यवहार पारदर्शक केले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मेमोरियल सेंटरच्या भूमिपूजनाला नरेंद्र मोदींना निमंत्रित करणार...