आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interviv About Kanta Girl Shaifali Shefali Zariwala

वडिलांना ‘कांटा लगा’ आवडले नाही, म्हणून मी चंदेरी दुनिया सोडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेफाली मंगळवारी एका कार्यक्रमानिमित्त शहरात आली होती. - Divya Marathi
शेफाली मंगळवारी एका कार्यक्रमानिमित्त शहरात आली होती.
औरंगाबाद-‘कांटालगा..’ या २००२ मध्ये आलेल्या व्हिडिओने देशभरात धूम केली. अन् कोणत्याही बड्या चित्रपट कलावंताच्या शिफारशीविना ग्लॅमरच्या जगात पाऊल टाकणारी शेफाली जरीवाला रातोरात स्टार झाली. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात हेच गाणे गाजू लागले. आता शेफाली सर्वात मोठी आयटम गर्ल होणार, असेही म्हटले जाऊ लागले. मात्र, तसे घडले नाही. २००४मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटात झळकून शेफाली गायब झाली.
त्यामागचे कारण तिने उलगडले. माझ्या वडिलांना ‘कांटा लगा’ मुळीच आवडले नाही. त्यांच्या इच्छेखातर मी आयटम साँगच्या पुढील ऑफर्स नाकारल्या. एवढेच नव्हे, तर वडिलांच्या आग्रहामुळे इंजिनिअरिंगकडे लक्ष केंद्रित केले, असेही ती म्हणाली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ३३ वर्षीय शेफाली मंगळवारी औरंगाबादला आली होती. त्या वेळी तिने सांगितलेला तिचा प्रवास तिच्याच शब्दांत.
माझे संपूर्ण कुटुंब बॉलीवूड आणि ग्लॅमरच्या जगापासून खूप निराळे आहे. माझ्यावरदेखील तेच संस्कार आहेत. वडील सीए, तर बहीण उच्चशिक्षित. मीदेखील इंजिनिअर होण्याच्या तयारीत होते. मुळात कांटा लगा... हे गमतीगमतीत झालेले गाणे आहे. मला व्हिडिओ निर्मात्यांकडून नृत्यासाठी विचारण्यात आले तेव्हा खासगी वाहिन्या, सोशल मीडियाचा बोलबाला नव्हताच. टीव्हीवर दिसणार या कल्पनेनेच मी भारावून गेले होते. कुटुंबानेदेखील गंमत म्हणून काम करण्यास हरकत नाही, असे सांगितले होते. पण जेव्हा ते हिट झाले तेव्हा लोक मला ओळखू लागले. मला आणि कुटुंबाला माझी अशी ओळख अपेक्षितच नव्हती. ‘कांटा लगा’सारख्या गाण्याच्या ऑफर्सचा पाऊस पडू लागला. वडिलांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मी त्या नाकारल्या. बॉलीवूडचे वातावरण माझ्या कुटुंबाला मानवणारे नाही, याची जाणीव झाली.
म्हणून सलमान खान, अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेल्या "मुझसे शादी करोगी' चित्रपटात काम करून मी मोठ्या पडद्याला, आयटम साँग्जना राम राम ठोकला. अर्थात नृत्याची आवड असल्याने छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. नच बलिये, बुगी वुगी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले, त्याचा आनंद मिळाला. सास-बहू सीरियल्समध्ये मी फिट बसत नसल्याने तशा मालिका करण्याची वेळही माझ्यावर आली नाही. पण या वर्षात छोट्या पडद्यावर मी नव्या रूपात झळकणार आहे.

१९७२ मध्येही उडवली होती धूम
कांटालगा मूळ गीत १९७२ मध्ये झळकलेल्या समाधी चित्रपटातील होते. त्यात धर्मेंद्र, जया भादुरी, आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यात मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेल्या आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याने तेव्हाही रसिकांमध्येही धूम उडवून दिली होती. १९७८ मध्ये या चित्रपटाचा तेलगुमध्ये ‘निंदू मनिषी’ या नावाने रिमेकही झाला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, 'कांटा लगा' मधील शेफालीचे ग्लॅमरस PHOTO'S...