आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारजाहमध्ये कोणताच कर नाही, गुंतवणूक करा : उपसंचालक बुखातीर यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नाआयकर, ना विक्रीकर. आयात-निर्यात करही नाही, अशा ठिकाणी पाय रोवण्याचे सर्वच उद्योजकांचे स्वप्न असते. ते भारतात शक्य नसले तरी शारजाहमध्ये ही वस्तुस्थिती आहे. तेथील वाणिज्य मंत्रालयाचे उपसंचालक रईद अल बुखातीर यांनीच गुरुवारी (१० डिसेंबर) ही माहिती दिली.
तेव्हा त्यांच्यासमोर उपस्थित असलेल्या औरंगाबादेतील सर्वच तरुण उद्योजकांचे चेहरे खुलले होते. शारजाह येथे उद्योग, व्यवसाय सुरू केला तर १९० देशांतील दीड अब्ज ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

१९७१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीची निर्मिती झाली. त्यातील शारजाह येथे भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळाच्या परिसरातच निर्माण करण्यात आलेल्या सैफ झोन वसाहतीत ७६६० कंपन्यांची कार्यालये, उद्योग आहेत. यातील निम्मे भारतीय आहेत. त्यांनी गेल्या १५-२० वर्षांत तेथे जम बसवला. मात्र, याची माहिती भारतातील बहुतांश नव्या उद्योजक, व्यावसायिकांना नाही. ती देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शारजाहचे वाणिज्य मंत्रालय काम करत आहे. औरंगाबादेत सुरू असलेल्या औद्योगिक प्रगतीची माहिती मिळाल्यावर येथील उद्योजकांना निमंत्रित करण्यासाठी बुखातीर आले होते. त्यांच्या विनंतीवरून सीआयआयच्या वतीने परिषदेेचे आयोजन करण्यात आले होते.

कोणताचकर नाही
बुखातीरम्हणाले की, आम्ही पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात आलो अाहोत. कारण येथील उद्योजकांची उत्पादने शारजाहच्या बाजारपेठेत आवश्यक आहेत, असे आमच्या सरकारला वाटते. कोणताही कर नाही, हेच आमचे बलस्थान आहे. तुमच्या शहरात उद्योग, व्यवसाय कायम ठेवून सैफ झोनमध्ये उत्पादन पाठवायचे आहे.

दारूसोडून कोणताही उद्योग करा
औरंगाबादेतऑटोमोबाइलसह अनेक चांगले उद्योग आहेत. विशेषत: लघु उद्योजकांमध्ये उत्तम क्षमता आहे. दारू तत्सम उत्पादनास आमच्या देशात बंदी आहे. त्यामुळे तेवढे सोडून कोणताही उद्योग औरंगाबादकरांनी सुरू करावा, असे आवाहन बुखातीर त्यांचे सहकारी जिथीनकुमार वरियर, थॉमस जोसेफ यांनी केले. सीआयआयचे विभागीय अध्यक्ष एन. श्रीराम, उपाध्यक्ष संदीप नागोरी, रमण आजगावकर आदींची परिषदेला उपस्थिती होती.

या सुविधा मिळतील
-कोणताहीकर नाही
-२४ तासांत सर्व परवाने
-तीन वर्षे व्हिसा शुल्क नाही
-५-६ ~ युनिटने मुबलक वीज
कर नाही, मग?
कुठलाचकर नाही तर शारजाह सरकारला आमच्या उद्योगांचा काय फायदा? या प्रश्नावर बुखातीर यांचे सहकारी जिथीनकुमार म्हणाले की, एकदा तुम्ही उद्योग सुरू केला की कुटुंबाला, मित्रांना घेऊन तुम्ही याल. सैफ झोनबाहेर पडाल. काही तरी खरेदी कराल. त्यातून होणारी उलाढाल आम्हाला पैसा मिळवून देईलच.

शारजाह -औरंगाबाद विमानसेवा :
औरंगाबादेतूनचांगला प्रतिसाद मिळाला तर अरेबिक एअर सर्व्हिसतर्फे शारजाह-औरंगाबाद थेट विमानसेवा सुरू करू, असे बुखातीर यांनी स्पष्ट केले.

भारतच जवळचा
जागतिकबाजारपेठेवर चीनचे वर्चस्व ही वस्तुस्थिती आहे. मात्र, सांस्कृतिकदृष्ट्या आम्हाला चीनपेक्षा भारत जवळचा वाटतो. शारजाहमध्ये सुमारे ३० लाख भारतीय अतिशय गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळेही भारतातील उद्योजकांनी आमच्या देशात व्यवसाय, उद्योग करावा, अशी अपेक्षा असल्याचे बुखातीर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...