आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचालकाची घाई, दुर्लक्ष; मध्येच वेगाने आलेल्या रिक्षामुळे अपघात, सखोल चौकशी सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद-भुसावळ-औरंगाबादअसा ४०० किमी प्रवास करून आलेली बस लगेच बीडसाठी निघाली. सिडको सिग्नलवर बस काढण्याची घाई करणाऱ्या चालकाने आजूबाजूला लक्ष दिले नाही. त्यातच वेगाने रिक्षा आला अन् हा विचित्र अपघात झाला, असे निरीक्षण एसटीच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी काढले आहे. १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या या घटनेची आगारप्रमुख अपघात विभागामार्फत चौकशी सुरू असून लवकरच सत्य समोर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 
सोमवारी पहाटे ५.४५ वाजता सिडको बसस्थानकातून भुसावळसाठी निघालेली बस (एमएच ४० एन ९७६८) दुपारी परतली. या चालकाने बस सुस्थितीत असल्याची नोंद लॉगशिटमध्ये केली. त्यानंतर चालक सज्जन इंदल नायमाने यांनी बीडकडे जाण्यासाठी बस स्थानकाबाहेर काढली. गेटपासून १०० मीटर पेक्षा कमी अंतरावर सिडको सिग्नल आहे. स्थानकातून बस वळवतानाच ब्रेक लावावा लागतो. समोरील अंतर्गत रस्त्यावरही वर्दळ असते. पुढे १० पावलांवर सिडको-जळगाव मार्ग आहे. बस स्थानकाबाहेर काढताना तारेवरची कसरत करताना ब्रेक लावावाच लागतो. पुढे सिडको सिग्नलजवळ उतार असल्याने वाहनावर नियंत्रण ठेवतानाच आजूबाजूला लक्ष द्यावे लागते. येथेच नायमाने यांची घोडचूक झाल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास येत आहे. सिग्नलवरून बस काढण्याच्या नायमाने यांनी आजूबाजूला लक्ष देणे आणि वेगात आलेला रिक्षा अगदी समोर आल्याने भीषण अपघात झाला. बस रिक्षाचालकाच्या चुकीमुळे दोघांचा जीव गेला तर सात जण जखमी झाले, अशा निष्कर्षापर्यंत एसटी काही अधिकारी पोहोचले आहेत, अशी माहिती त्यांनी खासगीत दिली. 
 
पोलिस, आरटीओ, एसटी अपघात विभाग करणार चौकशी 
ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या भीषण अपघातामुळे औरंगाबादकर हेलावले होते. या बस अपघाताची पोलिस चौकशी करत आहेत. ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचे चालकाने म्हटले आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांमार्फत आरटीओ प्रशासनास पत्र पाठवून तपासणी करण्यास सांगितले आहे. पोलिस, आरटीओ आणि एसटी अपघात विभागांमार्फत या सर्व प्रकरणाची चौकशी होणार आहे. 
 
बसची तपासणी अनिवार्य 
औरंगाबाद-भुसावळ-औरंगाबादया ४०० किमीच्या प्रवासात अनेक वळणे, चढ-उतार आहेत. बस तेथून सुरक्षितपणे सिडको स्थानकात आली आहे. चालक-वाहकाने बसबाबत काही तक्रार केली नाही. त्यानंतर बसचा चार्ज घेणाऱ्या चालक-वाहकाने बसची स्थिती तपासली का ? हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. बस ताब्यात घेताना तपासणी अनिवार्य असते. म्हणजेच बस चालवून पाहणे गरजेचे आहे. दोष निदर्शनास येताच ती बस रद्द करण्याचे निर्देश असताना ब्रेक फेल झालेली बस नायमाने यांनी चालवण्यास घेतली कशी? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 
 
आरटीओकडून चालढकल 
पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सोमवारीच आरटीओंना पत्र पाठवून बसची तपासणी करण्यास सांगितले. मात्र, ती झाल्याने माळाळे यांनी आरटीओ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली तरी मंगळवारी तपासणी झाली नाही. त्यात गुरुवार, शुक्रवार शासकीय सुटी आहे. आरटीओच्या चालढकलपणामुळे तपासास ब्रेक लागला आहे. 
बातम्या आणखी आहेत...