आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investors Make More Than 20 Percent Profit From Share Market This Diwali

गुंतवणूकदारांना लक्ष्मी पावली; दिवाळीत 20 टक्क्यांवर नफा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नोकरीबरोबर पर्यायी उत्पन्नासाठी शहरातील गुंतवणूकदारांनी यंदा दिवाळीच्या काळात फार्मा, आयटी, फूड अँड ग्रोसरी या सेक्टरमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली. विशेष म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार्‍या महिलांचे प्रमाण दहा टक्क्यांवर गेले आहे. दिवाळीच्या अगोदर आठ दिवस गुंतवणूक करून अनेकांनी यंदा 20 टक्क्यांवर नफा कमावला.

वाढत्या महागाईमुळे प्रत्येक जण उत्पनाचे स्रोत वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. बहुतेकांनी यासाठी शेअर्स ट्रेडिंगचा सुरक्षित पर्याय निवडला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 80 टक्के, तर भारतीय गुंतवणुकीचे प्रमाण 20 टक्केच आहे.

या वर्षी दिवाळीत झालेल्या ट्रेडिंगचा कल सिप्ला, वोक्हार्टसारख्या फॉर्मा, विप्रो, इन्फोसिस, टीसीएस या आयटी व फूड अँड ग्रोसरीमधील हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलगेट, आयटीसी इत्यादी कंपनींकडे होता. तर बँक, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये तुलनेने कमी गुंतवणूक करण्यात आली. या दिवाळीत महिलांनीही शेअर मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली. पूर्वी या व्यवसायात महिलांचा सहभाग केवळ एक ते दोन टक्के होता. गेल्या वर्षी तो पाच टक्क्यांपर्यंत आणि यंदा दहा टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, खुल्या धोरणामुळे यंदा निर्यात कमी अणि आयात जास्त प्रमाणात झाली. यामध्ये विशेषत: सोने आणि कच्च्या तेलामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला. मंदिचे सावट आणि रुपयाच्या घसरणीमुळे यंदा गुंतवणूकदार कमी झाले आहेत.

दिवाळीत 25 कोटींवर गुंतवणूक

ब्रोकरच्या सल्ल्यानुसार शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्यात आला. यंदा दिवाळीच्या आठ दिवस अगोदरपासूनच गुंतवणूकदारांनी शेअर्सची खरेदी केली. दिवाळीच्या मुहूर्तापर्यंत केवळ शहरातूनच हा आकडा अंदाजे 25 कोटींच्या वर पोहोचला आहे. अनेक गुंतवणूकदारांना आठ दिवसांत दहा ते वीस टक्के परतावा मिळाला.